मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने दरात घसरण, तर चांदीचा भावही उतरला; पाहा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, तर चांदीचा भावही उतरला; पाहा लेटेस्ट रेट

भारतीय सराफा बाजाराच्या उलट आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत, तर चांदीचा भाव स्थिर आहे.

भारतीय सराफा बाजाराच्या उलट आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत, तर चांदीचा भाव स्थिर आहे.

भारतीय सराफा बाजाराच्या उलट आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत, तर चांदीचा भाव स्थिर आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 जून : भारतीय सराफा बाजारात आज 9 जून 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. चांदीचा भावही (Silver Price Today) कमी झाला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 48,516 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा दर 70,595 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. भारतीय सराफा बाजाराच्या उलट आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत, तर चांदीचा भाव स्थिर आहे.

सोन्याचा नवा दर (Gold Price, 9 June 2021) -

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 92 रुपये प्रति 10 ग्रॅमने काहीसा कमी झाला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव आता 48,424 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोने दर 48,516 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

चांदीचा नवा दर (Silver Price, 9 June 2021) -

चांदीचा दरात आजही घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरात 414 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज चांदीचा दर 70,181 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 70,595 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - तुम्ही घेतलेलं सोनं असली की नकली? सरकारच्या या App द्वारे ओळखा)

सोने दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सोन्याचा भावही वर-खाली होतो आहे. मोतीलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस युरोपियन सेंट्रल बँकची बैठक आहे. गुंतवणूकदारांचं या बैठकीत होणाऱ्या निकलांकडे लक्ष आहे. त्यामुळे या सर्वांचा परिणाम सोने दरावर पाहायला मिळतो आहे.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today