सोन्याला नवी झळाळी, चांदीही झाली महाग, हे आहेत आजचे दर

सोन्याला नवी झळाळी, चांदीही झाली महाग, हे आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याचे भाव परत वाढले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 143 रुपयांनी वाढल्या. त्याचवेळी मागणी वाढल्याने चांदीचे भावही वाढले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याचे भाव परत वाढले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 143 रुपयांनी वाढल्या. त्याचवेळी मागणी वाढल्याने चांदीचे भावही वाढले आहेत. चांदी 108 रुपये किलोने महाग झाली आहे. सोन्याचे दर शुक्रवारी 38 हजार 695 रुपये प्रतितोळा झाले. गेले काही दिवस सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

चांदीही झाली महाग

दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 45 हजार 375 रुपये प्रतिकिलो झालीय.

का वाढले सोनं-चांदीचे दर?

तज्ज्ञांच्या मते,अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झालाय. त्यामुळेच घरगुती बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आणि 6 दिवसांपासूनची घसरण थांबली.

सोनंखरेदीसाठी नवा नियम

आता सोनं खरेदी करताना नवा नियम लागू होणार आहे. आता सोन्याचे दागिने किंवा कलाकृतीसाठी BIS हॉलमार्किंग सक्तीचं केलं जाणार आहे. केंद्र सरकार 15 जानेवारी 2020 ला अधिसूचना जारी करेल. 1 जानेवारी 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठीचं हॉलमार्किंग सक्तीचं होईल.

(हेही वाचा : भारताचा GDP आला 4.6 टक्क्यांवर, गेल्या 6 वर्षांतला नीचांकी दर)

सोन्याचं बिल आवश्यक

सोन्याची खरेदी करताना बिल अवश्य घ्या. इनकम टॅक्स रिटर्न भरताना या बिलाच्या मदतीने तुम्ही सोन्याचा सोर्स जाणून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही दाखल केलेल्या इनकम टॅक्स रिटर्न्सची तपासणी होते तेव्हा बिलाचा फायदा होऊ शकतो.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

==========================================================================================

First published: November 29, 2019, 6:18 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading