धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर धमाकेदार ऑफर्स, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर भरभक्कम सूट

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर धमाकेदार ऑफर्स, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर भरभक्कम सूट

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनंचांदीची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोनं महाग किंवा स्वस्त झालं तरी लोक सोनं घेण्यासाठी उत्सुक असतात. यासाठीच मोठमोठ्या सराफांनी सोन्याच्या दागिन्यांवर बऱ्याच सवलती दिल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनंचांदीची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोनं महाग किंवा स्वस्त झालं तरी लोक सोनं घेण्यासाठी उत्सुक असतात. यासाठीच मोठमोठ्या सराफांनी सोन्याच्या दागिन्यांवर बऱ्याच सवलती दिल्या आहेत. यामध्ये तनिष्क आणि मलबार गोल्ड अँड डायमंड्स सारखे ब्रँड्स आहेत.

बँकाही देतायत भरभक्कम सवलत

बँकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डांनी दागिन्यांची खरेदी करण्यासाठी कॅशबॅकची ऑफर दिली आहे. मोठमोठ्या ब्रँड्सच्या ऑफर्समध्ये घडणावळीववर सूट, मोफत सोन्याचं नाणं, मोफत सोनं- चांदी किंवा काही बक्षीसं अशा आकर्षक ऑफर्स आहेत.

तनिष्क

तनिष्कच्या 'विरासत' कलेक्शनमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर 25 टक्के सूट आहे. याच ब्रँडतर्फे JEWELFIE स्पर्धाही घेतली जाते. या स्पर्धेतल्या विजेत्याला दागिने भेट दिले जातील.

कल्याण ज्वेलर्स

कल्याण ज्वेलर्सच्या स्टोअरमध्ये ICICI बैंक क्रेडिट कार्ड देऊन किमान 30 हजार रुपयांची खरेदी करण्यासाठी 5 टक्के कॅशबॅक आहे. वेडिंग कलेक्शनच्या घडणावळीवरही 60 टक्के सूट आहे.

त्रिभुवनदास भीमजीदास झवेरी (TBZ)

TBZ ज्वेलर्सनीही सणाच्या दिवसांसाठी सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर घडणावळीची सूट दिली आहे. त्याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डाने खरेदी केली तर किमान 50 हजार रुपयांच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

रिलायन्स ज्वेल्स

रिलायन्स ज्वेल्सच्या सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळीवर 25 टक्के सूट देण्यात आलीय. हिऱ्याचे दागिने आणि सोन्याच्या नाण्यांच्या घडणावळीवरही 25 टक्के सूट देण्यात आली आहे. याशिवाय HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने खरेदी करण्यासाठी 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

मलबार गोल्ड अँड डायमंड्स

मलबार गोल्ड अँड डायमंड्स 15 हजार रुपयांच्या सोन्याच्या खरेदीवर 1 सोन्याचं नाणं मोफत देणार आहे. सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर घडणावळीमध्ये 10 टक्के जादा सूट दिली जातेय.

सेनको गोल्ड अँड डायमंड्स

सेनको कंपनी धनत्रयोदशीच्या निमित्ताने धनवृद्धी फेस्टिव्हल घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये सोन्याची खरेदी केली तर तिप्पट चांदी मोफत मिळते. प्लॅटिनमच्या दागिन्यांवरही घडणावळीत 20 टक्के सूट आहे.

======================================================================================

चंदनपुरी घाटातील धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पाहा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: October 25, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading