Home /News /money /

Gold Silver Price: सोनं 1049 रुपये तर चांदी 1588 रुपयांनी स्वस्त, इथे वाचा नवे दर

Gold Silver Price: सोनं 1049 रुपये तर चांदी 1588 रुपयांनी स्वस्त, इथे वाचा नवे दर

Gold-Silver Price:आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घसरणीनंतर देशांतर्गत बाजारातही सोन्याचांदीचे दर उतरले आहे.

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: कोरोना विषाणूपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी लस आल्याच्या वृत्तामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री सुरू केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती उतरल्या आहेत. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याच्या दरात 1049 रुपयांची घसरण झाली आणि एक किलो चांदीची किंमत 1588 रुपयांनी घसरली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. त्याशिवाय या महिन्यात गोल्ड ईटीएफची होल्डिंग 10 लाख औंसने खाली आली आहे. यातून असे संकेत मिळत आहेत की, गुंतवणूकदार हळूहळू सोन्यावरील होल्डिंग कमी करत आहेत. परदेशी बाजारात सोन्याचे दर चार महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. सोन्याचे नवे दर ( Gold Price, 24 November 2020) दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 1049 रुपयांची घसरण झाली, या घसरणीनंतर 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव 48,569 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोमवारी सोन्याचे दर 49,618 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,830 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा-मोदी सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार तुमचा PF, वाचा कुणाला होणार फायदा) चांदीचे नवे दर (Silver Price, 24 November 2020) एचडीएफसी सिक्योरिटीजच्या माहितीनुसार दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर  1,588 रुपये प्रति किलोने उतरले आहेत. यानंतर चांदीचे भाव  59,301 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोमवारी हे दर 60,889 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 23.42 डॉलर प्र​ति औंसवर आहे. का कमी होत आहेत सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे कमोडिटी अनालिस्ट तपन पटेल (HDFC Securities Senior, Analyst (Commodities) Tapan Patel) आणि मोतीलाल ओसवालचे वीपी रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते कोरोना लशीसंदर्भात समोर आलेल्या बातम्यामुळे सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे. (हे वाचा-Gold Price Today: लग्नसराईच्या काळात स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली) AstraZeneca ने सोमवारी कोविड -19 लसीविषयी सांगितले की ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या भागीदारीने विकसित होत आहे. ही लस इतर कंपन्यांपेक्षा खूपच स्वस्त आहे त्याचप्रमाणे 90 टक्के प्रभावी आहे. या बातमीनंतर सोन्याची सुरक्षित गुंतवणूक मागणी कमी झाली आहे. दुसरीकडे, अशी बातमी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष जेनेट येलेन यांना अमेरिकेची ट्रेजर सेक्रेटरी, बनण्याची योजना आखत आहेत. या बातमीचे अनेक व्यावसायिकांनीही स्वागत केले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या