Gold price today: खूशखबर! आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किंमतीतही घसरण

Gold price today: खूशखबर! आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किंमतीतही घसरण

एमसीएक्स (MCX) वर सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 1.5 टक्क्यांनी घसरुन 47,799 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर 1.6 टक्क्यांनी घसरून 70,345 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून: आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीनंतर सोन्यांचांदीच्या दरात (Gold-Silver) घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 1.5 टक्क्यांनी घसरुन 47,799 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर 1.6 टक्क्यांनी घसरून 70,345 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या संकेतानंतर सोन्यामध्ये 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आली होती. आशियाई बाजारात कालपेक्षा आज काही प्रमाणात कमी नुकसान झालं आहे आणि त्यामुळे गुंतवणुकदारांनी घसरणीचा फायदा उचलला आहे. याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 1,822.36 डॉलर प्रति औंस झाली आहे. याशिवाय अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी वाढून 27.09 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर प्लॅटिनमच्या दरात  0.5 टक्क्यांनी वाढ होऊन दर 1,127.49 डॉलर झाले आहेत.

हे वाचा-PF खातं आधारशी लिंक करण्यात येतायंत समस्या? तर सर्वात आधी करा हे काम

24 कॅरेट सोन्याचा भाव

17 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर घसरले आहेत. आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रति तोळा सोन्याचे दर  51590 रुपयांच्या जवळपास आहेत. याशिवाय चेन्नईमध्ये 49890 रुपये, मुंबईमध्ये 48400 रुपये, कोलकातामध्ये  51590 रुपये आणि बंगळुरुमध्ये 49460 रुपये प्रति तोळा अशा स्तरावर आहेत.

डिसेंबरमध्ये सोन्याचे दर गाठतील  53500 रुपयांचा स्तर

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार मार्केट तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर सध्या कन्सोलिडेशनच्या परिस्थितीतून जात आहेत. पुढे जाऊन सोन्याचे दर प्रति तोळा 48,500 रुपये या स्तरावर देखील पोहचू शकतात. बुलियन एक्सपर्ट्सच्या मते घसरणीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी, कारण सोन्याचे दर डिसेंबरपर्यंत 53,500 रुपये प्रति तोळावर पोहचू शकतात.

हे वाचा-Petrol Price Today: इंधनाचा भडका! परभणीत पेट्रोल 105 रुपये प्रति लीटरच्या पार

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 17, 2021, 1:27 PM IST

ताज्या बातम्या