जेट प्रकरणामुळे हवाई प्रवास महागला, तरीही 1375 रुपयात असं मिळेल विमानाचं तिकीट

जेट प्रकरणामुळे हवाई प्रवास महागला, तरीही 1375 रुपयात असं मिळेल विमानाचं तिकीट

गो एअरच्या या ऑफरचं नाव आहे फ्लाय स्मार्ट. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी 25 एप्रिलच्या आधी बुकिंग करायला हवं.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती जेट एअरवेज बंद पडल्याची. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. काही प्रवाशांचे पैसेही अडकलेत . एका बाजूला हे सुरू असताना गो एअर विमान कंपनीनं नवी आॅफर आणलीय. कंपनी 1375 रुपयांपासून विमान प्रवास करण्याची संधी देतेय. गो एअरच्या या आॅफरचं नाव आहे फ्लाय स्मार्ट. या आॅफरचा फायदा घेण्यासाठी 25 एप्रिलच्या आधी बुकिंग करायला हवं. त्यानंतर ही आॅफर मिळणार नाही. 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान तुम्हाला या आॅफरचा फायदा घेऊ शकता.

सर्वात स्वस्त फ्लाइट म्हणजे 1375 रुपयांची ही बागडोगरापासून गुवाहाटीपर्यंतची आहे. अहमदाबाद ते जयपूरचं तिकीट 1499 रुपयांचं आहे.

किती असेल भाडं?

अहमदाबाद ते चेन्नई 3348 रुपये, अहमदाबाद ते मुंबई 2149 रुपये, गुवाहाटी ते दिल्ली 4377 रुपये, कोलकाता ते दिल्ली 4201 रुपये, कोलकाता ते मुंबई 5500 रुपये, पाटणा ते बंगळुरू 5050 रुपये, अहमदाबाद ते मुंबई 1799 रुपये . गो एअरच्या वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकेल.

विस्ताराच्या बुकिंगवर आॅफर

टाटा ग्रुपची एअरलाइन कंपनी विस्तारानं घरगुती फ्लाइटच्या तिकिटांमध्ये 10 टक्के डिस्काऊंट दिलाय. याचा फायदा घेण्यासाठी इकाॅनाॅमी क्लासमध्ये कमीत कमी 4 तिकिटं बुक करायला हवीत.

सध्या विमानकंपन्या डबघाईला आल्यात अशा चर्चा असताना गो एअरच्या या आॅफरनं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दशकभरात किंगफिशरनंतर सेवा बंद करणारी जेट ही दुसरी कंपनी ठरली आहे. याआधी विजय मल्ल्याची किंगफिशर ही विमान कंपनी 2012 मध्ये बंद झाली होती. आता 26 वर्षे सेवा देणा-या जेट एअरवेजने आपल्या सेवा बंद केल्या आहेत. एकेकाळी 650 उड्डाण करणारी या कंपनीला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता आले नाही. अर्थात आता कंपनीने सेवा बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फाटका बसला आहे. 22 हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात आहे. त्यात 16 हजार नियमीत तर 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच जेटचे समभाग देखील 27 टक्क्यांहून अधिक कोसळले आहेत.

जेटला वाचवण्यासाठी कंपनीने बँकांकडून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण बँकांनी त्यास नकार दिला. उड्डाण बंद झाल्यामुळे जेटचे 16 हजार नियमीत कर्मचारी आणि 6 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जेटच्या कर्मचाऱ्यांना पगारच दिला नाही. धक्कादायक बाब म्हणजे जेटने सेवा बंद करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांना सांगितलाच नाही. जेट उड्डाण बंद करणार आहे, ही बातमी कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यमांकडून कळाली होती.

First published: April 20, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading