मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Go Fashion IPO ची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांचे पैसे काही तासात डबल

Go Fashion IPO ची दमदार लिस्टिंग, गुंतवणूकदारांचे पैसे काही तासात डबल

Go Fashion IPO च्या आयपीओची वरची किंमत 690 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र शेअर 1316 च्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 90.7 टक्के प्रीमियमने लिस्ट झाले.

Go Fashion IPO च्या आयपीओची वरची किंमत 690 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र शेअर 1316 च्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 90.7 टक्के प्रीमियमने लिस्ट झाले.

Go Fashion IPO च्या आयपीओची वरची किंमत 690 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र शेअर 1316 च्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 90.7 टक्के प्रीमियमने लिस्ट झाले.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : महिलांसाठी बॉटम वेअर बनवणाऱ्या गो फॅशनच्या शेअर्सने (Go Fashion share) मंगळवारी शेअर बाजारात दमदार एंट्री केली. गो फॅशनच्या शेअर्सने लिस्टिंगच्या (Go Fashion share listing) पहिल्याच दिवशी 94.3 टक्क्यांनी वाढून 1,341 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. आयपीओला गुंतवणूकदारांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद, कंपनीच्या वाढीची भक्कम शक्यता, उत्तम व्यवस्थापन, फॅशनच्या बदलत्या ट्रेंडमध्ये नोकरदार महिलांची वाढती संख्या यामुळे या शेअरबद्दलचे सेंटीमेंट मजबूत झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गो फॅशनच्या आयपीओची वरची किंमत 690 रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र शेअर 1316 च्या इश्यू किमतीपेक्षा सुमारे 90.7 टक्के प्रीमियमने लिस्ट झाले. थोड्या वेळाने शेअरमध्ये काहीशी घसरण झाली आणि गो फॅशनचे शेअर्स पहिल्या दिवशी बीएसईवर 81.54 टक्क्यांनी वाढून 1252.60 रुपयांवर बंद झाले. NSE वर शेअर 81.70 टक्क्यांच्या वाढीसह 1253.70 रुपयांवर बंद झाला.

Multibagger Stock : 8.86 रुपयांचा शेअर 886 रुपयांवर; 1 लाख बनले 1 कोटी

तज्ज्ञांचे मत काय आहे?

तज्ज्ञ लाँग टर्म गुंतवणूकदारांना (Long Term Investment) हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत. दुसरीकडे, शॉर्ट टर्म गुंतवणूकदार बंपर लिस्टिंग पाहता लिस्टिंग प्रॉफिट बुक करू शकतात.

Swastika Investmart चे रिसर्च हेड संतोष मीना म्हणाले की, गो कलर्सचे ब्रँड वॅल्यू मजबूत आहे, परंतु त्याच्या महसुलात अस्थिरता दिसून येत आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2021 मध्ये तोट्यात होती. नोकरदार महिलांच्या वाढत्या संख्येमुळे, अशी अपेक्षा आहे की कंपनीची ग्रोथ होईल. कंपनीकडे एक मजबूत मॅनेजमेंट टीम आहे आणि चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. पुढे म्हटलं की, शेअर अलॉट झालेले गुंतवणूकदार 1,000 रुपयांचा स्टॉप लॉसवर लाँग टर्मसाठी स्टॉक होल्ड करु शकतात. दुसरीकडे, सुरक्षित गुंतवणूकदार शेअर्स विकून प्रॉफिट बुक करू शकतात. तर नवीन खरेदीसाठी शेअरमध्ये घसरण होण्याची प्रतीक्षा करू शकतात.

उद्या 1 डिसेंबरपासून होणार 'हे' पाच बदल; काय होतील परिणाम?

Mehta Equities चे उपाध्यक्ष (रिसर्च) प्रशांत तापसी यांनीही दीर्घकालीन गुंतवणूकदारांना शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अशा कंपन्या शेअर बाजारात नेहमीच चांगली कामगिरी करतात, ज्यात वाढीची क्षमता असते. महिलांचा बॉटम वेअर बिझनेस वेगाने वाढणारा बिझनेस आहे. पुढील 2-3 वर्षांमध्ये शेअर 24.3 टक्क्यांच्या चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. या वाढीचा फायदा घेण्यासाठी गो फॅशन मजबूत आहे असा आम्हाला विश्वास आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market