Go Air झालं आता Go First; अधिक स्वस्त विमानप्रवास आणि नाविन्याची हमी

Go Air झालं आता Go First; अधिक स्वस्त विमानप्रवास आणि नाविन्याची हमी

13 मे रोजी गो एअर आता गो फर्स्ट होत असल्याबद्दल देशभरातील विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिसल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे: वाडिया समूहाची (Wadia Group) मालकीची विमान कंपनी असलेल्या गो एअरचं (Go Air) नामकरण आता गो फर्स्ट (Go First) असं करण्यात आलं आहे. कंपनीनं आपला कायापालट करत आयपीओ (IPO) आणण्यासाठी आणि महत्वाकांक्षी विस्ताराच्या (Expansion) दृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. सध्याच्या कोरोना साथीमुळे विमान वाहतुकक्षेत्राला (Aviation Sector) मोठा फटका बसला आहे. या साथीनंतर हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या दमानं उतरण्याची तयारी कंपनीनं केली आहे.

13 मे रोजी गो एअर आता गो फर्स्ट होत असल्याबद्दल देशभरातील विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिसल्या. स्वस्त विमान प्रवास, नवीन कर्मचारी वर्ग, सुरक्षित यंत्रणा अशा आश्वासनांसह विमानांच्या शेपटीवरील लोगो बदलासह या जाहिरातीत गो फर्स्टची झलक दिसून आली. तर दुपारी कंपनीनं अधिकृतरीत्या गो एअर आता गो फर्स्ट म्हणून ओळखलं जाईल अशी घोषणा केली. 2005 मध्ये कंपनीनं आपली सेवा सुरू केली आणि आतापर्यंत कंपनीकडं फक्त 50 विमानं आहेत.

गो एअर नंतर एका वर्षानंसुरू झालेल्या प्रतिस्पर्धी इंडिगोचा (Indigo) विस्तार पाच पट अधिक आहे.व्होडाफोनने हच ताब्यात घेतल्यानंतर एका रात्रीत सगळं बदलून टाकलं होतं तसं काही इथं झालेलं नाही. प्रत्येक विमानासाठी वेगळ्या रंगाची शेपटी आणि क्रूसाठी वेगवेगळे गणवेशयाची सुरुवात गो एअरने केली होती. पण वेगवेगळ्या रंगांमुळे वैविध्यपूर्ण सुट्या भागांची उपलब्धता राखणे अवघड असल्यानं विमान कंपनीनं वेगानं यात बदल केला आणि फक्त ग्रे आणि निळा असे रंग वापरण्यास सुरुवात केली. नंतर तर फक्त निळ्या रंगाचाच वापर सुरू झाला. अशा प्रकारचे काही मापदंड घालण्याची सुरुवात दशकापूर्वी झाली. आता कंपनी नव्या उमेदीनं झेपावण्यास सज्ज असून, आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यासह दर महिन्याला एका नवीन विमानाचा समावेश करण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाचा ओघ वाढवण्यासाठी तसंच व्यवसाय विस्तार करण्यासाठी कंपनीनं आयपीओ आणण्याची योजना आखली आहे.

वाचा: कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा, हे आहे कारण; पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

रिब्रँडिंगची किंमत:

गेले 14 महिने भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी खूप कठीण होते. गो एअरही त्याला अपवाद नाही. कंपनीला रिब्रँडिंगसाठीही (Rebranding) मोठी किंमत मोजावी लागणार आहे. नवीन विमानं नव्या लोगोसह येतील पण त्यात काही अडचण आली तर जुनी विमाने वापरावी लागतील त्यामुळं त्यातही बदल करणं आवश्यक आहे. स्वस्त दरात विमान प्रवासाची सुविधा देण्यासाठी कंपनीला अनेक बदल करावे लागणार आहेत. प्रत्येक सीटसाठी नवीन सुरक्षा कार्डे छापणे हे एक मोठे काम आहे. कारण एका विमानात 186 आसने आहेत आणि अशी 50 विमाने आहेत. म्हणजे जवळजवळ दहा हजार कार्डे छापावी लागणार आहेत. ‘अल्ट्रा लो-कॉस्ट’ एअरलाइन्ससाठी विमानाची बाह्य आणि अंतर्गत सजावट, चेक-ईन-काउंटर आणि कार्यालययावरही खर्च करावा लागणार आहे.

भारतात रिब्रँडिंग :

देशात गो एअरने जेव्हा सेवा सुरू केली तेव्हापासून म्हणजेच गेल्या 15 वर्षात तीन रिब्रँडिंगचे प्रयत्न झाले. गो एअरने कामकाज सुरू केल्याच्या अवघ्या एका महिन्यानंतर ‘इंडियन एअरलाइन्सचे नाव ‘इंडियन’ करण्यात आलं. 2011मध्ये इंडियन एअरलाईन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले. एक वर्षानंतर, जेट एअरवेजने एअर सहारा विकत घेतली आणि जेटलाइट म्हणून ती दाखल केली. जेट एअरवेजने जेट कनेक्ट नावाची स्वस्त दरातील विमान कंपनीही चालवली. 2019 मध्ये जेट एअरलाइन्सचे सगळेच कामकाज थांबले.

2008मध्ये किंगफिशर एअरलाइन्सने एअर डेक्कन विकत घेतली आणि तिला सिंपलीफाय डेक्कन असे नाव दिले. स्वस्त दरातील विमान कंपनी म्हणून किंग फिशर रेड कार्यरत होती. जेट प्रमाणेच किंग फिशर एअरलाइन्स देखील अखेर एकच कंपनी म्हणून काम करू लागली आणि 2012मध्ये ती ही बंद पडली.

वाचा: प्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF? त्यावर कसा आकारला जातो कर?

सकारात्मक बाजू:

ही विमान कंपनी देशातील पहिली निओ विमानसेवा होण्याची शक्यता आहे. जुनी विमाने टप्प्याटप्प्यानं काढून टाकण्यासाठी इंडिगोची प्रशंसा केली जात आहे. त्यामुळे या नवीन विमान कंपनीला प्रोत्साहन मिळेल. जुन्या विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चातून कंपनीची सुटका होईल. पी रॅट आणि व्हिटनी इंजिन्सच्या समस्या दूर झाल्यावर ए 320 निओची कामगिरी सुधारल्यानं विमान कंपनीच्या प्रगतीला चालना मिळेल. आयपीओमधून उभ्या राहणाऱ्या भांडवलातून ही विमान कंपनी देशातील दुसरी मोठी विमान कंपनी होऊ शकेल. अनेक वर्षांनंतर ही गो एअरनं म्हणावा तसा नाव लौकिक मिळवलेला नाही. आता एक नवीन आणि आकर्षक ब्रँड म्हणून दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार आणि प्रवासी दोघांनाही ही कंपनी आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे. आधी स्पाइसजेट आणि नंतर इंडिगोया कंपन्या नॉन-एलसीसी मॉडेलकडे वळल्या आहेत. स्वस्त किमतीतील विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये आता एअर एशिया इंडियाखेरीज फक्त गो एअर हीच एकमेव कंपनी आहे. एअर इंडियासाठी टाटानी लावलेल्या बोलीवर एअर एशियाचे भवितव्य अवलंबून आहे, त्यामुळे भविष्यात गो एअर हीच एकमेव लो कॉस्ट विमान कंपनीअसू शकते.

आपल्या जाहिरातीमध्ये एअरलाइन्सने ‘पॉईंट टू पॉइंट’ उल्लेख केला आहे. आपल्या सर्व भारतीय कंपन्याप्रमाणे गो एअरही पॉईंट-टू-पॉईंट मॉडेलपासून दूर गेली होती आणि तिनं एक स्टॉप फ्लाइट आणि कनेक्शन्स सेवा सुरू केल्या. मुंबई आणि दिल्लीही तिची प्रमुख केंद्रे असून या दोन्ही शहरांमधून तिनं विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्य पदार्थ पुरवणे आणि पॅन-इंडिया कनेक्टिव्हिटी देण्यास मदत केली आहे. पुन्हा ‘पॉईंट टू पॉइंट’ सेवा सुरू झाल्यास नवीन मोठी बाजारपेठ खुली होऊ शकेल. स्लॉट वाटपादरम्यान नवीन मार्गाला प्राधान्य मिळते त्यामुळं मुंबई आणि दिल्ली या सर्वाधिक गर्दी असलेल्या विमानतळावर आणखी वाहतूक वाढेल. सर्व कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती सर्वांच लक्ष वेधून घेऊ शकली तर तिचं हेरी ब्रँडिंग आणि नवी ओळख फलदायी ठरेल.

First published: May 14, 2021, 9:55 PM IST

ताज्या बातम्या