Elec-widget

अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 प्रमुख उद्योगांमध्ये झाली घट

अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 प्रमुख उद्योगांमध्ये झाली घट

देशातल्या आर्थिक मंदीचा सिलसिला कमी होण्याची चिन्हं नाहीत. त्यातच आता 8 प्रमुख उद्योगांमधलं उत्पादन घटून ते उणे 5.8 टक्क्यांवर आलं आहे. गेल्या 10 वर्षांत या प्रमुख उद्योगांची एवढी घसरण कधीच झाली नव्हती.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : देशातल्या आर्थिक मंदीचा सिलसिला कमी होण्याची चिन्हं नाहीत. नुकतेच GDP चे दर जाहीर झालेत. हा दर 4.5 टक्क्यांवर आलाय. त्यातच आता 8 प्रमुख उद्योगांमधलं उत्पादन घटून ते उणे 5.8 टक्क्यांवर आलं आहे.

10 वर्षांतली मोठी घसरण

गेल्या 10 वर्षांत या प्रमुख उद्योगांची एवढी घसरण कधीच झाली नव्हती. यामध्ये कोळसा, कच्चं तेल, नैसर्गिक वायू, पोलाद, सिमेंट, विद्युतनिर्मिती, खतं आणि तेलशुद्धीकरण क्षेत्राचा समावेश आहे.

जागतिक स्तरावरच आर्थिक स्थिती बिघडलेली असताना वैयक्तिक गुंतवणूक आणि मागणीमध्ये झालेली घट यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी झालाय. हा दर गेल्या 6 वर्षांतला नीचांकी दर आहे.

वित्तीय तूट आणखी वाढली

गेल्या 7 महिन्यांत देशाची वित्तीय तूट 7.2 लाख कोटींवर आली. एक वर्षापूर्वी सरकारची वित्तीय तूट 6. 48 लाख कोटी इतकी होती.

GDP घसरला

पहिल्या तिमाहीमध्ये GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 4.5 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 6 वर्षांमधला हा नीचांकी दर आहे. मागणी कमी झाल्याने आणि वैयक्तिक गुंतवणूक कमी झाल्याने GDP चा दर खालावला, असं तज्ज्ञांचं मत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमधला हा आर्थिक विकासाचा दर सरकारने जाहीर केला आहे. 2018 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर 7% होता. या घटलेल्या आकड्यांमुळे आता केंद्र सरकारसमोर अर्थव्यवस्था सुधारण्याचं मोठं आव्हान आहे.

===========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com