मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhar Card: सरकारी योजनांसाठी आधारकार्ड देणं ठरू शकतं धोकादायक, गैरप्रकार टाळण्यासाठी निवडा 'हा' पर्याय

Aadhar Card: सरकारी योजनांसाठी आधारकार्ड देणं ठरू शकतं धोकादायक, गैरप्रकार टाळण्यासाठी निवडा 'हा' पर्याय

आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी; ही प्रोसेस वापरून करा अपडेट

आधार कार्ड 10 वर्षं जुनं असेल तर येऊ शकतात अडचणी; ही प्रोसेस वापरून करा अपडेट

आधार नंबरवरून बँक अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे तुमचा आधार नंबर गेला असला तरी बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही, असं यूआयडीएआयनं काही दिवसांपूर्वी ट्विट करून सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 ऑक्टोबर: बँक खात्याची सर्व माहिती काढून ऑनलाइन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. कुठलीही शासकीय योजना किंवा इतर महत्त्वाचं काम करायचं असल्यास आधार कार्ड जवळ बाळगणं अत्यंत आवश्यक झालं आहे. परंतु आधार कार्डची फोटोकॉपी देताना त्याचा गैरवापर तर होणार नाही ना? आपल्या आधार नंबरचा फायदा घेऊन बँक खात्यातील रक्कम काढली जाते की काय? अशी भीती सर्वांना वाटते. पण एखाद्या व्यक्तीला आधार नंबर कळाला तरी बँक अकाउंटला याचा काहीही धोका नसल्याचं यूआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरिटी ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलयं.

भारतीय नागरिकाची सांगणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हा सर्वांत महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्डविना तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. बँक अकाउंट उघडायचं असेल तरी आधार असणं गरजेचं आहे. सध्या सर्व प्रकारच्या ऑनलाइन नोंदणीसाठीही आपणाला आधार नंबर देणं गरजेचं आहे. त्याचमुळे आपला आधार नंबर अनेक ठिकाणी शेअर केला जातो. आधार नंबरवर आपली सर्व वैयक्तिक माहिती असते. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. यात सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आधार नंबरवरून बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का? याचं उत्तर आधार कार्ड देणाऱ्या यूआयडीएआयनं दिलं आहे.

आधार कार्डमध्ये असते महत्त्वाची माहिती-

कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात केवळ एकदाच आधार नंबर दिला जातो. यूआयडीएआयच्या वतीने हा नंबर दिला जातो. आधार कार्डमध्ये 12 अंकांचा एक विशिष्ट क्रमांक असतो. यामुळे संबंधित नागरिकांची माहिती मिळत असते. यात पत्ता, आई-वडिलांचं नाव, वय यासह बरीच माहिती उपलब्ध असते.

 बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का?

आधार नंबरवरून बँक अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे तुमचा आधार नंबर गेला असला तरी बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही, असं यूआयडीएआयनं काही दिवसांपूर्वी ट्विट करून सांगितलं आहे. यात केवळ आधार नंबरची माहितीमुळे बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही. आधार नंबर देण्याची इच्छा नसल्यास VID या मास्क्ड आधारचा वापर करण्याचा पर्याय आहे, असं यूआयडीएआयनं ट्विटमध्ये म्हटलयं. मास्क्ड आधारही सर्वत्र स्वीकारलं जात असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय.

हेही वाचा: हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहाणाऱ्या मुलींनी 'या' गोष्टींची नेहमी घ्या काळजी, कधीही होणार नाही फसवणूक

 मास्क्ड आधार आहे तरी काय?

एखाद्या ठिकाणी आधार कार्ड देण्याची आवश्यकता असल्यास मास्क्ड आधार कार्डचा वापर करू शकता, असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलंय. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही मास्क्ड आधारकार्ड डाउनलोड करू शकता. सर्वसाधारण आधार कार्डवर सर्व आकडे येतात. परंतु मास्क्ड आधार कार्डमध्ये आधारचे शेवटचे चार आकडे दिसतात. उर्वरित 8 आकडे लपवले जातात. आठ क्रमांकाच्या ठिकाणी XXXX-XXXX असं दिसतं.

ऑनलाइन करता येईल डाउनलोड-

मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर यूआयडीएआयच्या वेबसाइटवर जाऊन ‘Do You Want A Masked Aadhaar’ हा पर्याय निवडा. येथे आवश्यक ती सर्व माहिती भरून मास्क्ड आधार कार्ड डाउनलोड केलं जाऊ शकतं. सरकारच्या मते, कुठल्याही संस्थेत लोकांनी आधार कार्डची फोटोकॉपी देणं आवश्यक नाही. कारण याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी मास्क्ड आधारचा वापर करता येऊ शकतो.

First published:

Tags: Aadhar card