वडिलांच्या अकाऊंटमध्ये पडतील आयुष्यभर पैसे, त्यांना द्या 'असं' गिफ्ट

वडिलांच्या अकाऊंटमध्ये पडतील आयुष्यभर पैसे, त्यांना द्या 'असं' गिफ्ट

खाजगी नोकरी करणाऱ्यांना नेहमीच निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता लागली असते. तुमचे वडील खाजगी कंपनीत काम करत असतील, तर तुम्ही त्यांना चांगलं गिफ्ट देऊ शकाल.

  • Share this:

मुंबई, 02 फेब्रुवारी : खाजगी नोकरी करणाऱ्यांना नेहमीच निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता लागली असते. तुमचे वडील खाजगी कंपनीत काम करत असतील, तर तुम्ही त्यांना चांगलं गिफ्ट देऊ शकाल. त्यामुळे निवृत्तीनंतर पुढे काय याची चिंता त्यांना भेडसवणार नाही. जाणून घ्या काही सरकारी योजनांबद्दल. ही योजना अशी आहे की ज्यानं तुमच्या वडिलांच्या खात्यात आयुष्यभर पैसे येत राहतील.

काय आहे योजना?

ही आहे NPS. म्हणजे न्यू पेंशन सिस्टिम. या योजनेमुळे तुम्ही तुमच्या वडिलांना त्यांच्या 60 वर्षांनंतर दर महिना पैसे देऊ शकाल. पेंशनची रक्कम तुम्ही नक्की करू शकाल. ही योजना जाॅइन करण्यासाठी जास्तीत जास्त वय आहे 65 वर्ष.

कुठल्या वयात उघडू शकाल अकाऊंट?

सर्वसाधारणपणे वडिलांचं वय 40 ते 45 वर्ष असतं, तेव्हाच मुलाची कमाई सुरू होते. त्यामुळे मुलाकडे एनपीएस काँट्रिब्युशनसाठी 15 ते 20 वर्षच उरतात. तुम्ही 65 वर्षांपर्यंत एनपीएस काँट्रिब्युशन करू शकता. एनपीएस काँन्ट्रिब्युशनची काही मर्यादा नाही. तुम्ही त्यात कितीही पैसे गुंतवू शकता.

NPS अकाऊंट कसं उघडाल?

देशातल्या सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये NPS अकाऊंट उघडता येतं. नेहमी आपण अकाऊंट उघडताना जी कागदपत्रं लागतात, तीच कागदपत्र याही वेळी लागतील.बँक तुम्हाला रजिस्ट्रेशन फाॅर्म देते. तो तुम्ही भरायचा.

मुलगा किंवा मुलगी म्हणून प्रत्येकाचंच आपल्या आईवडिलांबाबत कर्तव्य असतं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आईला किंवा वडिलांना गिफ्ट दिलं तर नक्कीच त्यांना आनंद मिळू शकतो.

प्रेग्नंट होताना अडचणी येतायत? डाएटमध्ये सामील करा ही 5 फळं आणि भाज्या

First published: February 2, 2019, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading