कर्ज घेणं आता सोपं; फक्त एक Missed call करा आणि मिळवा Loan

कर्ज घेणं आता सोपं; फक्त एक Missed call करा आणि मिळवा Loan

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकांच्या फेऱ्या मारायची गरज नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: कर्ज (Loan) काढण्याची प्रक्रिया सर्वात किचकट प्रक्रिया समजली जाते. पण देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने (State Bank of India)  आपल्या ग्राहकांसाठी खास नवीन योजना आणली आहे. यामध्ये पर्सनल लोनसाठी (Personal Loan) इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना  मोठा लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची गरज नसून केवळ एका फोनमध्ये तुम्हाला हे पर्सनल लोन मिळणार आहे.

बँकेनं आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून ही माहिती दिली आहे. पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्हाला केवळ 7208933142 या क्रमांकावर मिसकॉल द्यायचा आहे. त्यानंतर बँक तुम्हाला तात्काळ फोन करून तुमच्या अर्जावर प्रक्रिया सुरू करेल.  हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारे सेक्युरिटी आणि गॅरंटरची गरज भासणार नाही.

पर्सनल लोनचे फीचर्स

1) या पर्सनल लोनसाठी तुम्हाला 9.60 टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे.

2) यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतच पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता.

3) कमी व्याज दर

4) कमी प्रोसेसिंग चार्ज

5) कमीतकमी कागदपत्रं लागणार

6) झिरो हिडन कॉस्ट

7) सिक्युरिटी आणि गॅरंटरची गरज भासणार नाही.

हे वाचा -  SBI च्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 10000, वाचा काय आहे ही BEST बचत योजना

या सेवेविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 1800-11-2211 या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. याचबरोबर 7208933142 या क्रमांकावर फोन करून देखील माहिती मिळवू शकता. तुम्हाला मेसेजद्वारे देखील माहिती मिळणार आहे. यासाठी तुम्हाला PERSONAL असं टाईप करून 7208933145 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर देखील तुम्हाला याची माहिती मिळणार आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 17, 2021, 3:02 PM IST

ताज्या बातम्या