लंडन, 28 नोव्हेंबर: वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बिझनेस सुरू करून 26 व्या वर्षी अब्जाधीश बनलेल्या (Girl from UK started business at age of 21 and earned 1 billion rupees) तरुणीचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याचं साधन (Business a tool to earn money faster) म्हणून व्यापाराकडे पाहिलं जातं. अनेकजण व्यापारात असं काही कसब दाखवतात की कुठलेही छक्के-पंजे न करताही त्यांचा व्यापार यशस्वी होतो आणि कमी काळात ते मोठं यश मिळवतात. ब्रिटनमधील एका तरुणीनंही असंच कमी वयात घवघवीत यश मिळवलं आहे.
टिकटॉकवरून केलं शेअर
ब्रिटनमधील लिंडा नावाच्या तरुणीनं टिकटॉकवरून आपली यशोगाथा शेअर केली आहे. वयाच्या 21 व्या वर्षी तिनं स्वतःचा बिझनेस सुरू केला. त्यावेळी तिच्याकडे 5 लाख डॉलर होते. याची किंमत भारतीय चलनात होते साडे तीन कोटी रुपये. सहा वर्षानंतर आता ती 1 अब्जांची मालकीण झाली आहे. योग्य अभ्यास, नियोजन आणि कष्टाच्या जोरावर तिनं सहा वर्षांत हे यश संपादन केलं आहे.
लोकांना गुंतवणुकीचा सल्ला
लोकांना गुंतवणूकविषयक सल्ला देणं, हेच लिंडाचं मुख्य काम. लिंडाफायनान्स नावाने तिचे व्हिडिओ ओळखले जातात. ब्रिटनमध्ये अनेक लोकांना तिच्या या व्हिडिओचा फायदा झाला. जेव्हा तुम्ही 21 व्या वर्षी साडेतीन कोटी रुपये खर्च करता आणि तुम्हाला सहा वर्षांत अब्जाधीश झाल्याचं समजतं, तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असल्याचं लिंडा म्हणते.
हे वाचा- सिगरेटमुळे वाचले प्राण, डोळ्यांदेखल कोसळलं भलंमोठं झाड; पाहा, थरारक VIDEO
गुंतवणुकीच महत्त्व
लिंडानं गुंतवणूकीचं महत्त्व ओळखणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केलेली गुंतवणूक हेच प्रत्येकाच्या आर्थिक समृद्धीचं गमक असल्याचं लिंडानं म्हटलं आहे. लोकांना गुंतवणुकीचं महत्त्व समजून देणं, हाच आपल्या आय़ुष्याचा उद्देश असून इथून पुढेही आपण हेच काम करत राहणार असल्याचा निर्धार तिनं व्यक्त केला आहे. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.