Amazon सोबत काम करण्याची संधी; महिन्याला होईल 70 हजारांपर्यंत कमाई

Amazon सोबत काम करण्याची संधी; महिन्याला होईल 70 हजारांपर्यंत कमाई

अ‍ॅमेझॉनने नोकरीची घोषणा केली आहे, ज्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकते. कंपनीचे जवळपास सर्वच शहरांमध्ये सेंटर आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये नोकरीची संधी आहे. अ‍ॅमेझॉनने त्यांच्यासोबत 20 हजार लोकांना जोडण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉनकडून नोकरी (amazon jobs) देण्यात येणार असून, ही नोकरी फुल टाईम, पार्ट टाईम कोणत्याही प्रकारे करता येऊ शकते. गरज असल्यास केवळ 4 तासही नोकरी करून महिन्याला 70 हजारपर्यंत कमाई करता येऊ शकते.

तुमच्याच शहरात मिळेल नोकरी -

अ‍ॅमेझॉनने डिलिव्हरी बॉयच्या नोकरीची घोषणा केली आहे, ज्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकते. कंपनीचे जवळपास सर्वच शहरांमध्ये सेंटर आहेत. त्यामुळे या नोकरीसाठी दुसऱ्या कोणत्याही शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

असा करा अर्ज -

डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी थेट अ‍ॅमेझॉनच्या साईटवर https://logistics.amazon.in/applynow अप्लाय करू शकता. त्याशिवाय अ‍ॅमेझॉनच्या कोणत्याही सेंटरवर जाऊन नोकरीसाठी अर्ज दिला जाऊ शकतो.

डिलिव्हरी बॉय या जॉबसाठी दिवसभर काम करावं लागत नाही. एरियानुसार पॅकेट दिलं जातं. डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 तासांत जवळपास 100 ते 150 पॅकेट डिलीव्हर केले जातात. डिलिव्हरी बॉयची, नोकरी करण्यासाठी डिग्री असणं आवश्यक आहे. डिलिव्हरी करण्यासाठी बाईक, स्कूटरची गरज आहे. बाईक किंवा स्कूटर इंन्शोरन्स, आरसीसह असावी. अर्ज करणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

(वाचा - 1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजावर FASTag अनिवार्य; जाणून घ्या कसा मिळवाल फास्ट)

डिलिव्हरी बॉयला इतर कंपनीप्रमाणेच, दर महिन्याला वेतन दिलं जातं. कंपनी आपल्या डिलिव्हरी बॉयला 12 ते 15 हजार रुपये वेतन देते. यात पेट्रोलचा खर्च स्वत:चा असतो. एक प्रोडक्ट किंवा पॅकेट डिलिव्हर केल्यानंतर 15 ते 20 रुपये मिळतात. डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीनुसार, जर कोणी संपूर्ण महिनाभर काम केलं आणि दररोज 100 पॅकेट डिलिव्हर केले, तर सहजपणे 60000 ते 70000 रुपये महिना कमाई होऊ शकते.

(वाचा - दिवाळीत हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर; प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा शिडकाव)

त्याशिवाय कंपनी काही प्रकारच्या प्रोडक्टसाठी वाहन उपलब्ध करून देते. यात मोठ्या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी होते. मोठ्या प्रोडक्टसाठी कंपनी काही अटींवर मोठं वाहन डिलिव्हरी बॉयला उपलब्ध करून देते.

Published by: Karishma Bhurke
First published: November 15, 2020, 11:33 AM IST
Tags: amazon

ताज्या बातम्या