मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home Loan सोबत सुरु करा SIP, लोन फिटेपर्यंत घराचे संपूर्ण पैसे रिकव्हर होतील

Home Loan सोबत सुरु करा SIP, लोन फिटेपर्यंत घराचे संपूर्ण पैसे रिकव्हर होतील

Investment Tips: EMI सुरू होताच, जर तुम्ही एका महिन्याच्या हप्त्यापैकी फक्त 20 टक्के SIP सुरू केली, तर 20 वर्षांनंतर तुम्हाला बँकेच्या कर्जाची किंमत आणि त्यावरील एकूण व्याज रिटर्न मिळेल.

    मुंबई, 3 ऑगस्ट : स्वत:चं घर असावं हे सर्वांचच स्वप्न असतं किंबहुना ती मोठी गरज देखील आहे. मात्र मुंबई-पुणे यासारख्या शहरांमध्ये घराच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. त्यामुळे घरखरेदीसाठी होमलोन घ्यावच लागतं. मात्र बँकेला या कर्जासाठी भरपूर व्याज द्यावे लागते. अशावेळी दीर्घ मुदतीसाठी असे काही आर्थिक नियोजन करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. जेणेकरुन तुमच्या घराची संपूर्ण किंमत वसूल झाली पाहिजे. SIP यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. EMI सुरू होताच, जर तुम्ही एका महिन्याच्या हप्त्यापैकी फक्त 20 टक्के SIP सुरू केली, तर 20 वर्षांनंतर तुम्हाला बँकेच्या कर्जाची किंमत आणि त्यावरील एकूण व्याज रिटर्न मिळेल. फायनान्शियल एक्सप्रेच्या वृत्तात बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम म्हणतात की इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे हा दीर्घ मुदतीसाठी चांगला पर्याय आहे. दीर्घकाळात बाजारातील अनेक जोखीम कव्हर केल्या जातात. इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड निवडणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. रिटर्न चार्ट पाहता, असे अनेक फंड आहेत ज्यांनी गेल्या 20 वर्षांत 12 ते 15 टक्के किंवा त्याहून अधिक रिटर्न दिले आहेत. CNG Price Hike: महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, चेक करा नवे दर  20 वर्षांसाठी 30 लाख कर्जावर कॅल्क्युलेशन >> कर्ज मूल्य: 30 लाख >> EMI कार्यकाळ: 20 वर्षे >> व्याज दर: 8% >> मासिक EMI: 25093 रुपये >> एकूण व्याज: 30,22,368 रुपये >> एकूण पेमेंट: 60,22,368 रुपये SIP मधून संपूर्ण खर्च कसा वसूल करायचा? येथे तुम्हाला दरमहा EMI मूल्याच्या 20 टक्के SIP करावे लागेल, जे सुमारे 5000 रुपये असेल. यावर वार्षिक 14% व्याज पकडले तर 20 वर्षानंतर एसआयपीचे वॅल्युएशन 66 लाख रुपये होते. यात तुमची एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये असेल. तर व्याज 54 लाख असेल. त्यामुळे तुमच्या कर्जापेक्षा थोडा जास्त लाभ तुम्हाला येथे मिळेल. GST On Train Food: सर्वसामान्यांना फटका! ट्रेन असो किंवा प्लॅटफॉर्म, खाद्यपदार्थांवर द्यावा लागेल टॅक्स, जाणून घ्या नवा नियम 20 वर्षात सर्वाधिक SIP परतावा असलेले फंड >> ICICI Pru Technology: 20 टक्के/प्रतिवर्ष >> SBI Consmpn Opp: 19.5 टक्के/प्रतिवर्ष >> Nippon Ind Growth: 19.5 टक्के/प्रतिवर्ष >> SBI Magnum Global: 19 टक्के/प्रतिवर्ष >> ICICI Pru FMCG: 19 टक्के/प्रतिवर्ष >> Quant Active: 17.5 टक्के/प्रतिवर्ष
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Home Loan, Investment, Money

    पुढील बातम्या