मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Upcoming IPOs: 7 दिवसात कमाईची सुवर्णसंधी! या 4 ठिकाणी पैसे गुंतवून मिळवा चांगला रिटर्न

Upcoming IPOs: 7 दिवसात कमाईची सुवर्णसंधी! या 4 ठिकाणी पैसे गुंतवून मिळवा चांगला रिटर्न

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

पुढील 7 दिवसांत तुम्ही जर मार्केटमधून कमाई करु इच्छित असाल तर तुम्हाला आता चांगली संधी आहे. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ (IPO) आणले आहेत.

नवी दिल्ली, 09 जून: पुढील 7 दिवसांत तुम्ही जर मार्केटमधून कमाई करु इच्छित असाल तर तुम्हाला आता चांगली संधी आहे. देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ (IPO) आणले आहेत. या आयपीओत पैसे गुंतवल्यास तुम्ही एका दिवासात लखपती होऊ शकता. 2021 मध्ये आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आयपीओ आणले आहेत. या माध्यमातून गुंतवणुकदारांना (Investors) चांगला अर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे जाणून घेऊनया येत्या 7 दिवसांत कोणकोणत्या कंपन्यांच्या आयपीओमधून तुम्हाला चांगली कमाई करण्याच्या संधी आहेत...

या आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये (Primary Market)  4 आयपीओ दाखल होत आहेत. यात श्याम मेटॅलिक्स, नवोदय एंटरप्रायझेस, अभिषेक इंटीग्रेशन लिमिटेड आणि सोना कॉमस्टार या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या कमाईची संधी मिळू शकते.

श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड आयपीओ

कोलकाता येथील स्टिल उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड (Shyam Metalics and Energy Limited) 14 जूनला 909 कोटी रुपयांचा इनिशिअल पब्लिक ऑफर लॉन्च करीत आहे. या इश्यूसाठी प्राईज बॅण्ड 303 ते 306 रुपये प्रतिशेअर असा ठरवण्यात आला आहे. याच्या लॉटचा आकार 48 शेअर असेल. तुम्ही 14 ते 16 तारखेदरम्यान यात पैसे गुंतवू शकता. अंकर गुंतवणूकदारांसाठी 11 जूनपासून बोली सुरु करण्यात येईल.

हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात तेजी, खरेदीआधी इथे तपासा लेटेस्ट भाव

नवोदय एंटरप्रायझेस आयपीओ

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नवोदय एंटरप्रायझेस (Navoday Enterprises) देखील 14 जूनला आपला आयपीओ लाँच करत आहे. कंपनीचे या आयपीओच्या माध्यमातून 46.08 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य आहे. तुम्ही हा आयपीओ 17 जूनपर्यंत खरेदी करु शकता. आयपीओ साठी कंपनीने इश्यू प्राईस 20 रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

सोना कॉमस्टार आयपीओ

सोना कॉमस्टार कंपनी (Sona Comstar) 14 जूनला आयपीओ लॉन्च करीत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 5500 कोटी रुपये जमा करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. हा आयपीओ खरेदीसाठी 14 जूनपासून उपलब्ध होईल. सोना कॉमस्टारने प्रायमरी मार्केटमधून 6000 कोटी रुपये जमा करण्याची तयारी केली होती. परंतु आता ही कंपनी 5500 कोटी रुपये जमा करणार आहे. आयपीओसाठी कंपनी 300 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर जारी करणार आहे.

हे वाचा-इंधनाचा भडका! मुंबईमध्ये पेट्रोल 102 रुपये लीटर, किंमतींनी गाठला उच्चांक

अभिषेक इंटिग्रेशन लिमिटेड आयपीओ

अभिषेक इंटिग्रेशन लिमिटेडचा (Abhishek Integration Limited) आयपीओ 8 जूनला लाँच झाला आहे. तुम्ही 11 जूनपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करु शकता. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 4.95 कोटी रुपये जमा करण्याचे उदिदष्ट ठेवले आहे. याची इश्यू प्राईज प्रतिशेअर 50 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.

First published:

Tags: Investment, Money