मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Saving Account: बचत खात्यामार्फत मिळवा चांगली रक्कम, या तीन बँका देतायंत सर्वाधिक व्याजदर

Saving Account: बचत खात्यामार्फत मिळवा चांगली रक्कम, या तीन बँका देतायंत सर्वाधिक व्याजदर

पैसे सुरक्षित ठेवण्याचा आणि गरजेला ते उपलब्ध होण्याचा साधा सरळ पर्याय म्हणजे बँकेत बचत खातं (Saving Account) काढणं. पण या खात्यात रक्कम ठेवल्याबद्दल बँक फारसं चांगलं व्याज देत नाही त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा पर्याय फारसा फायद्याचा मानला जात नाही. मात्र या तीन बँकांमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळू शकतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 जून: आपल्याला मिळालेले पैसे योग्य पद्धतीने साठवणे आणि त्याच्या गुंतवणुकीतून अधिकाधिक पैसे मिळवणे या उद्देशाने प्रत्येक व्यक्ती पर्याय शोधत असते. पैसे सुरक्षित ठेवण्याचा आणि गरजेला ते उपलब्ध होण्याचा साधा सरळ पर्याय म्हणजे बँकेत बचत खातं (Saving Account) काढणं. या खात्यातले पैसे गरजेच्या वेळी लगेच काढता येऊ शकतात पण या खात्यात रक्कम ठेवल्याबद्दल बँक फारसं चांगलं व्याज देत नाही त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा पर्याय फारसा फायद्याचा मानला जात नाही. पण जेव्हा गरज पडते तेव्हा हे अकाउंटच महत्त्वाचं ठरतं. सध्या कोरोना काळात सगळ्याच बँकांनी बचत खात्यातील रकमेवरचं व्याज कमी केलं आहे. पण तीन बँका मात्र इतरांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. आरबीएल बँक, बंधन बँक आणि येस बँक या बँकेत तुम्ही बचत खातं काढलंत तर तुम्हाला चांगलं व्याज मिळू शकतं.

आरबीएल बँक

सगळ्या व्यावसायिक बँकांच्या (Commercial Banks) तुलनेत सद्यस्थितीत आरबीएल बँक (RBL Bank) बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या बँकेत बचत खात्यातील रकमेवर 4.5 ट्क्क्यांपासून 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातंय. या बँकेतल्या बचत खात्यात तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवलीत तर तुम्हाला वर्षाला 4.5 टक्के व्याज मिळू शकतं. 1 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम तुमच्या खात्यात असेल तर 6 टक्के व्याज तुम्हाला मिळेल आणि 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम सेव्हिंग खात्यात तुम्ही ठेवलं तर तुम्हाला वार्षिक 6.25 टक्के व्याज मिळेल.

हे वाचा-या बँकेच्या ग्राहकांना पैसे जमा करण्यासाठी लागणार शुल्क, चेकबुकबाबतही नियमात बदल

बंधन बँकही

यानंतर बंधन बँकेतही तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. बंधन बँकेत (Bandhan Bank) जर तुम्ही बचत खातं काढलंत तर तुम्हाला त्यातील रकमेवर वार्षिक 3 ते 6 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं. तुमच्या बचत खात्यात दररोज किती रुपये शिल्लक आहेत यानुसार तुम्हाला व्याज किती मिळणार हे ठरतं. या बँकेतल्या बचत खात्यात तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवलीत तर तुम्हाला वर्षाला 3 टक्के व्याज मिळू शकतं. 1 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम तुमच्या खात्यात असेल तर 4 टक्के व्याज तुम्हाला मिळेल आणि 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम सेव्हिंग खात्यात तुम्ही ठेवलं तर तुम्हाला वार्षिक 6 टक्के व्याज मिळेल.

हे वाचा-ग्राहकांसाठी SBI ALERT! हे काम पूर्ण नसल्यास बंद होतील महत्त्वाच्या सेवा

येस बँक

येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार या बँकेतील सेव्हिंग खात्यात ठेवलेल्या रकमेवर 4 ते 5.5 टक्के वार्षिक व्याज मिळतं. या बँकेतल्या बचत खात्यात तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवलीत तर तुम्हाला वर्षाला 4 टक्के व्याज मिळू शकतं. 1 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंत रक्कम तुमच्या खात्यात असेल तर 4.75 टक्के व्याज तुम्हाला मिळेल आणि 10 लाख रुपयांपासूनच ते 100 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम दररोज सेव्हिंग खात्यात तुम्ही ठेवली तर तुम्हाला वार्षिक 5.5 टक्के व्याज मिळेल.

असं व्याज मिळत असेल तर नक्कीच तुम्हाला या बँकात खातं उघडण्याची इच्छा होई शकते. पण कुठल्याही बँकेतील व्याजदर पाहताना त्यासोबत असलेली नियमावलीही आवर्जून वाचून समजून घ्या आणि मगच खातं उघडा.

First published:

Tags: Bank, Investment, Money, Saving bank account