Home /News /money /

Ratan Tata यांनी गुंतवणूक केलेल्या Startup मध्ये तुम्हीही करा Invest, होईल लाखोंची कमाई

Ratan Tata यांनी गुंतवणूक केलेल्या Startup मध्ये तुम्हीही करा Invest, होईल लाखोंची कमाई

जाणून घ्या जेनेरिक आधार (Generic Aadhaar) या स्टार्टअप (Startup) कंपनीबद्दल. जेनेरिक औषधांच्या (Generic Medicines) या कंपनीत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची गुंतवणूक आहे.

वर्षा पाठक, नवी दिल्ली, 05 ऑगस्ट: कोरोना महामारीने (Corona Pandemic) देशाची अर्थव्यवस्था (Economy) तर बिघडवून टाकलीच आहे; पण सर्वसामान्य नागरिकांचं बजेटही कोलमडलं आहे. कोरोनामुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. त्यामुळे प्रत्येकालाच उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधावे लागले. या पार्श्वभूमीवर तुम्हीही स्वतःचा काही व्यवसाय (Own Business) सुरू करू इच्छित असाल, तर एक चांगली संधी आहे. ही संधी अशी आहे, की कमी गुंतवणुकीत (Investment) तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकाल. आम्ही सांगत आहोत जेनेरिक आधार (Generic Aadhaar) या स्टार्टअप (Startup) कंपनीबद्दल. जेनेरिक औषधांच्या (Generic Medicines) या कंपनीत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची गुंतवणूक आहे. ही कंपनी फ्रँचायझी देणार असून, त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट (One Time Investment) अर्थात एकदाच गुंतवणूक करण्याची गरज असून, जेनेरिक औषधांचं दुकान सुरू करता येऊ शकतं. त्यातून महिन्याला चांगली कमाई होऊ शकते. जेनेरिक आधार या कंपनीच्या फ्रँचायझी टीमने 'न्यूज 18 हिंदी'शी साधलेल्या संवादावेळी अशी माहिती दिली आहे की, या कंपनीची फ्रँचायझी (Franchise) कोणीही घेऊ शकतं. ही फ्रँचायझी घेण्यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. ही कंपनी आपल्या पार्टनर्सना 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन (Margin) देते. मोठमोठ्या औषध कंपन्याही जास्तीत जास्त 15 ते 20 टक्के मार्जिन देतात. त्यामुळे या कंपनीचं मार्जिन चांगलं आहे. ही कंपनी 1000 जेनेरिक औषधं दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यात कंपनीच्या ग्राहकांनाही तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. ही कंपनी दुकानांव्यतिरिक्त ऑनलाइन ऑर्डर्सही स्वीकारते. ऑनलाइन ऑर्डर्स तुमच्या शहरातल्या असतील, तर त्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील, हाही एक फायदा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, उत्तर प्रदेशात या कंपनीचे अनेक रिटेलर्स फ्रँचायझीद्वारे महिन्याला आठ ते 10 लाखांपर्यंतची कमाई करत आहेत. अर्थातच, शहर आणि ठिकाण यांवरही कमाईचं प्रमाण अवलंबून आहे. ज्या व्यक्ती आधीपासूनच मेडिकल दुकान चालवत आहेत किंवा ज्यांना नव्याने दुकान सुरू करायचं आहे, अशा कोणालाही ही फ्रँचायझी मिळू शकते, असं जेनेरिक आधार या कंपनीने सांगितलं आहे. फ्रँचायझी घेतल्यानंतर कंपनीकडून GA चा (Generic Aadhaar) ब्रँड लोगो मिळेल. तसंच, ब्रँडिंग मटेरियल, इन हाउस प्रॉडक्ट्स, तसंच इन हाउस सॉफ्टवेअरही दिलं जातं. यासाठी अर्थात ड्रग लायसन्सही घेणं बंधनकारक आहे. जेनेरिक आधार ही फार्मसी कंपनी अर्जुन देशपांडे (Arjun Deshpande) या युवकाने सुरू केली. पुण्यातून सुरू झालेल्या या कंपनीचा व्याप आता 18 राज्यांतल्या 130हून अधिक शहरांपर्यंत पोहोचला आहे. हा व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो. रतन टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. तुम्हालाही या कंपनीची फ्रँचायझी घ्यायची असेल, तर https://genericaadhaar.com/ या अधिकृत वेबसाइटवर जावं. तिथे गेल्यावर Business Opportunity हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फ्रँचायझीसाठी ऑनलाइन फॉर्म उघडला जातो. याशिवाय व्यवसायासंदर्भात अधिक माहितीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी https://genericaadhaar.com/franchise-opportunities.php या लिंकवर जावं. नाव, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि शहराचं नाव आदी माहिती इथे भरावी लागेल. फ्रँचायझीसंदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवरही संपर्क साधता येऊ शकतो. पश्चिम भारत : 9653373636 उत्तर भारत : 9653373640 पूर्व भारत : 9653373641 दक्षिण भारत : 9653373639 (डिस्क्लेमर: कंपनीकडून मिळालेल्या माहितीवरून ही माहिती देण्यात आली आहे. फ्रँचायझी घेण्यापूर्वी ग्राहकांनी स्वतः माहितीची पडताळणी करणं आवश्यक आहे)
First published:

Tags: Ratan tata

पुढील बातम्या