मराठी बातम्या /बातम्या /मनी /

FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर वाचा या टिप्स, विम्याबरोबरच मिळवा करामध्ये सवलत

FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर वाचा या टिप्स, विम्याबरोबरच मिळवा करामध्ये सवलत

बँक फिक्स डिपॉझिट (FD) हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित, सोपे आणि सर्वोत्तम रिटर्नमुळे लोकांसाठी सर्वात पसंतीचा गुंतवणूक पर्याय (Investment Option) ठरला आहे. सध्या घसरलेल्या व्याजदरांमुळे एफडी पर्याय आकर्षक रिटर्न देऊ शकत नाही. अशावेळी गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 17 फेब्रुवारी: बँक फिक्स डिपॉझिट (FD) हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित, सोपे आणि सर्वोत्तम रिटर्नमुळे लोकांसाठी सर्वात पसंतीचा गुंतवणूक पर्याय (Investment Option) ठरला आहे. सध्या घसरलेल्या व्याजदरांमुळे एफडी पर्याय आकर्षक रिटर्न देऊ शकत नाही. विशेषत: महागाई दराच्या (Inflation) हिशोबाने याचा विचार केला तर रिटर्न शून्यावर पोहचले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकीच्या इतर पर्यायांकडे वळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे जे गॅरंटिड रिटर्न (Guaranteed Return) देत आहेत. म्‍युच्युअल फंड (MF), बाँड (Bonds), पीपीएफ (PPF) यांच्यासह काही गुंतवणूकीसाठीचे पर्याय उपलब्ध आहेत. पण गुंतवणूकदार असा पर्याय शोधत आहेत जो लाँग टर्म म्हणजे कमीत कमी 20-25 वर्षात चांगले रिटर्न देऊ शकतील. गुंतवणुकीचे सल्लागार आणि सीए हरिगोपाल पाटीदार यांनी सांगितले की, अशावेळी गॅरंटीड रिटर्न प्लॅन गुंतवणुकीसाठी चांगला असू शकतो. यामध्ये रिटर्न एफडीपेक्षा चांगले मिळतात. हे पूर्णपणे टॅक्स फ्री असते. यासोबतच लाइफ इन्शूरन्स देखील मिळतो. त्यामुळे आज आपण गॅरंटीड रिटर्नच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. विम्याच्या रकमेवर 10 पट रिस्क कव्हर गॅरंटीड रिटर्न प्लॅन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रिस्क कव्हर मिळतो. जर एखादी व्यक्ती वार्षाला 2 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल आणि काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 20 लाख रुपये मिळतील. गुंतवणूकीच्या रक्कमेवर कर नाही गॅरंटीड रिटर्न प्लॅन पूर्णपणे कर सवलत लाभासह येतो. म्हणजे गुंतवणूक केलेल्या पैशांवर आणि मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही कर आकारला जात नाही. (हे वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर, या शहरात पेट्रोलचे दर शंभरी पार) इनकम टॅक्सनुसार गुंतवणुकीची योजना ठरवा बहुतेक सरकारी बँकांकडून देण्यात येणारा दीर्घ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर 5.4 टक्के ऐवढा असतो. अशावेळी 30 टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या पैशांवर टॅक्स रिटर्न 4 टक्क्यांपेक्षा कमी बसतो. रिटायरमेंट फंड तयार करू शकता मार्केटमध्ये काही गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स असे सुद्धा आहेत ज्यामध्ये 30 वर्षांची व्यक्ती रिटायरमेंट फंडासाठी 30 वर्षांची पॉलिसी मुदतीसह प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर, मॅच्युरिटीवर जवळपास 50 लाख रुपये मिळू शकतात. पीपीएफ आणि एफडीवर असा कमी झाला व्याजदर पीपीएफमध्ये 20 वर्षांपूर्वी प्रतिवर्ष 11-12 टक्के व्याज मिळत होता. आता फक्त 7.1 टक्के व्याज मिळते. अशाच पद्धतीने 2014 मध्ये बँक एफडीवर व्याज दर 8.5 टक्के ऐवढा होता. 2020 पर्यंत यामध्ये घट होत तो 5.4 टक्क्यांवर आला आहे. समस्या इथेच संपली नाही तर पुढच्या काही वर्षात या व्याज दरांमध्ये 3 ते 5 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारण देश विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
First published:

Tags: Fixed Deposit, Money

पुढील बातम्या