Home /News /money /

आजच करा Aadhaar 'या' खात्याशी लिंक आणि मिळवा 5000 रुपये, जाणून घ्या प्रोसेस

आजच करा Aadhaar 'या' खात्याशी लिंक आणि मिळवा 5000 रुपये, जाणून घ्या प्रोसेस

जर तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल तरी तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. मात्र यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) देशातील गरीब जनतेचे अकाउंट झिरो बॅलन्सवर बँक, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. जर तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल तरी तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. मात्र यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय PMJDY खात्यासही आधार कार्ड लिंक केले पाहिजे. या योजनेंतर्गत पंतप्रधान मोदींचा उद्देश प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हा होता. जन धन योजनेंतर्गत आपण 10 वर्षाखालील मुलाचे खाते देखील उघडू शकता. वाचा-ATM मधून पैसे नाही आले तरी खात्यातून कापले गेले पैसे, वाचा अशावेळी काय कराल? ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ओव्हरड्राफ्ट सुविधा ही एक सुविधा आहे ज्या अंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही पैसे काढू शकतो. याचा अर्ध खातेदारांच्या खात्यात शून्य रक्कम आहे. जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल तर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ त्या खात्यावर मिळणार नाही. वाचा-नोकरधारकांसाठी खुशखबर! आली PFची WhatsApp सर्व्हिस ओव्हरड्राफ्ट सुविधा घेण्याची अट अशी खातेधारकाला ही सुविधा मिळवण्यासाठी पहिल्या 6 महिन्यांपर्यंत खात्यात पुरेसे पैसे ठेवावे लागतील आणि या कालावधीत त्यांनी वेळोवेळी या खात्यावर व्यवहारही करावा. अशा खातेदारांना रुपे डेबिट कार्डे दिली जातात, ती सहजपणे व्यवहारासाठी वापरली जाऊ शकतात. वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण असं उघडा नवं खातं जन धन खातं उघण्यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि अवलंबून असलेल्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड इत्यादी द्याव्या लागतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या