Home /News /money /

तुमच्या मुलीसाठी 15 लाखांचं गिफ्ट! पूर्ण करा तिचं 'सुपरगर्ल' होण्याचं स्वप्न, वाचा काय आहे योजना

तुमच्या मुलीसाठी 15 लाखांचं गिफ्ट! पूर्ण करा तिचं 'सुपरगर्ल' होण्याचं स्वप्न, वाचा काय आहे योजना

'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) सुरू केली. या योजनेअंतर्गत आई-वडील किंवा पालक आपल्या मुलीच्या (Girl Child) नावाने खातं उघडू शकतात. जास्तीत जास्त दोन मुलींची खातीच उघडता येतात.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 07 मे : आपली मुलगी सुपरगर्ल बनावी, अशी प्रत्येक आई-वडिलांचीच इच्छा असते. पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन, गुंतवणूक चांगल्या पद्धतीने करावी लागते. त्याकरता केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवणं हा उत्तम पर्याय आहे. पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank)नुकतीच या योजनेबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. तसंच ही योजना आपल्या बँकेतही उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment) केली, तर मुलगी मोठी होईपर्यंत गुंतवणूक 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) सुरू केली. या योजनेअंतर्गत आई-वडील किंवा पालक आपल्या मुलीच्या (Girl Child) नावाने खातं उघडू शकतात. जास्तीत जास्त दोन मुलींची खातीच उघडता येतात. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, की 'कधी तिला शिक्षिका बनायचं असतं, तर कधी डॉक्टर. कधी ती म्हणते की सुपरगर्ल बनणार. तुम्ही-आम्ही मिळून तुमच्या छोट्या परीच्या स्वप्नांच्या पूर्तीकरता भरारी घेण्यासाठी मदत करू या. सुकन्या समृद्धी योजना आमच्याकडे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी बँकेत किंवा वेबसाईटवर संपर्क साधावा.' योजनेची माहिती - - या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा महत्त्वाच्या कोणत्याही बँकांमध्ये खातं उघडता येतं. - खातं उघडताना फॉर्मसह मुलीचा जन्मदाखला, मुलगी आणि आई-वडिलांचं ओळखपत्र (पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यांपैकी एक) आणि पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणी बिल यांपैकी एक) जमा करावा लागतो. - या योजनेत किमान 250 रुपये जमा करावे लागतात. वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये या खात्यात जमा करता येतात. - या योजनेतला सध्याचा व्याज दर वार्षिक 7.6 टक्के आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी या दरांचा आढावा घेऊन त्यात बदल करते. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कर सवलतही मिळते. - खातं उघडल्यानंतर 21 वर्षांनी किंवा मुलीला 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर हे खातं मॅच्युअर होतं. मुलीचा विवाह, उच्च शिक्षणाचा खर्च आदींसाठी यातून पैसे काढता येतात. - दर महिन्याला या योजनेत तीन हजार रुपये गुंतवले, तर वर्षाला 36 हजार रुपये होतात. 14 वर्षांत 7.6 टक्के व्याजदराने, चक्रवाढ व्याजाने 9,11,574 रुपये मिळू शकतात. 21 वर्षांनी म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी ही रक्कम 15,22,221 रुपये एवढी होईल.

(वाचा - कोरोनामध्ये 'या' कर्मचाऱ्यांना 4 दिवसांचा आठवडा;Covid उपचाराचा खर्च कंपनी उचलणार)

- आई किंवा वडील आपल्या मुलीच्या नावावर हे खातं उघडू शकतात. - मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत केव्हाही हे खातं उघडता येतं. - एका मुलीच्या नावावर एकच खातं उघडता येतं. - एका दाम्पत्याला आपल्या जास्तीत जास्त दोनच मुलींसाठी हे खातं उघडता येतं. - केवळ जुळ्या किंवा तिळ्या मुलांचा जन्म झाल्यासच दोनपेक्षा जास्त खाती एका कुटुंबात उघडता येतात.
First published:

पुढील बातम्या