भारताचा GDP आला 4.6 टक्क्यांवर, गेल्या 6 वर्षांतला नीचांकी दर

भारताचा GDP आला 4.6 टक्क्यांवर, गेल्या 6 वर्षांतला नीचांकी दर

देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे. पहिल्या तिमाहीमध्ये GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 4.5 टक्क्यांवर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे. पहिल्या तिमाहीमध्ये GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 4.5 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 6 वर्षांमधला हा नीचांकी दर आहे. मागणी कमी झाल्याने आणि वैयक्तिक गुंतवणूक कमी झाल्याने GDP चा दर खालावला, असं तज्ज्ञांचं मत आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमधला हा आर्थिक विकासाचा दर सरकारने जाहीर केला आहे. 2018 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर 7% होता.

उत्पादन क्षेत्रातली घट, ऑटोमोबाइल आणि रिअल इस्टेट क्षेत्राची संकटातली स्थिती, वाढती बेरोजागारी या सगळ्या चिंतांमध्ये आता GDP चे दर घसरल्याने भरच पडली आहे.

======================================================================

First published: November 29, 2019, 6:04 PM IST
Tags: GDPmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading