• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका; GDP मध्ये गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी घट

देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका; GDP मध्ये गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी घट

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना मोठा फटका सहन करावा लागला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : 2020-21 च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातील जीडीपीचे आकडे समोर आले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या या आकड्यांनुसार जीडीपीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 40 वर्षांतील ही सर्वाधिक घट असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या कहरामुळे देशातील व्यवसाय ठप्प झाले होते. या काळात देशातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्यादरम्याचे हे आकडे समोर आले आहेत. कोरोना (Coronavirus) मुळे एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे सकल घरेलू उत्पादनात (GDP)  23.9  टक्के ऐतिहासिक घट नोंदविण्यात आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाने वित्त वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून तिमाहीच्या जीडीपीचे आकडे जारी केले आहेत. काही वेळापूर्वी आलेल्या कोर सेक्टरच्या आकड्यांनी मोठी निराशा केली आहे. जुलै महिन्यात आठ इंडस्ट्रीच्या उत्पादनात 9.6 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. मंत्रालयांच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीमध्ये रियल जीडीपी 26.90 लाख कोटी रुपयांची होती, तर गेल्या वर्षी या अवधीत ही 35.35 लाख कोटी रुपये होती, या प्रकारे यामध्ये 23.9 टक्के घट आली आहे. या तिमाहीतील दोन महिने म्हणजेच एप्रिल आणि मे मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने व्यवसाय ठप्प होते. परिणामी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. त्यात जूनमध्ये अर्थव्यवस्थेत थोडा सुधार पाहायला मिळाला. या कारणाने रेटिंग एजेंसिया आणि अर्थतज्ज्ञांनी याबाबत शक्यता वर्तवली होती. त्यांच्यानुसार जून तिमाहीत जीडीपीमध्ये 16 ते 25 टक्क्यांची घट होऊ शकते. जर असं झालं तर ही ऐतिहासिक घट नोंदविण्यात येईल.
  Published by:Meenal Gangurde
  First published: