मराठी बातम्या /बातम्या /मनी /प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत कशी झाली वाढ?

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत कशी झाली वाढ?

जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली, 23 मे : जगातील श्रीमंत व्यक्तींविषयी सर्वांनाच आकर्षण असतं. जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षीच्या जानेवारीपासून त्यांच्या संपत्तीत 32.7 अरब डॉलरची (2.38 लाख कोटी) वाढ झाली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान दोन दिवसांपूर्वीच मिळवला आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या कंपन्यांना देशांतर्गत शेअर बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड फायदा झाला. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) वर दर्शवण्यात आलेल्या नव्या आकड्यांनुसार आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 66.5 अरब डॉलर येवढी झाली आहे. तर चीनच्या झोंग शानशान यांची एकूण संपत्ती 63.6 अरब डॉलर येवढी आहे.

तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आजही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते अग्रस्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 76.3 अरब डॉलर आहे. या दोन करोडपतींच्या संपत्तीमध्ये आता 63,530 कोटींचा अंतर राहिले आहे. मात्र सध्या राजधानी यांची जोरदार वाढ अशीच कायम राहिल्यास ते कदाचित पहिल्या क्रमांकावर पोचू शकतील, असे सांगण्यात येत आहे.

गौतम अदानी सध्या देश आणि आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून अदानी समूहाच्या सहा कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. मंगळवारी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 3.06 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल झोन लिमिटेडचा शेअर 2.85 टक्क्यांनी, अदानी टोटल गॅसचा शेअर 3.90 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनचा शेअर 5 टक्क्यांनी आणि अदानी पॉवरचा शेअर 5 टक्क्यांनी वाढला आहे. याबरोबरच अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 4.94 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. अदानी ग्रुपच्या 5 कंपन्यांचा मार्केट कॅप तब्बल एक लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

हे वाचा - चिंताजनक..! कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुणांचा मृत्यू, तज्ज्ञांनी सांगितली तीन कारणं…

ब्लूमबर्ग बिलिनीयर्स इंडेक्सनुसार जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे तेराव्या तर गौतम अदानी हे चौदाव्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे जेफ बेजोस हे आहेत. 163 बिलियन डॉलर संपत्तीसह दुसऱ्या नंबरवर टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे आहेत. याशिवाय तिसऱ्या नंबरवर बर्नाड अनॉल्ट, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आणि पाचव्या क्रमांकावर मार्क झुकेरबर्ग यांचा नंबर आहे.

First published:

Tags: Business News, Mukesh ambani, Share market