मराठी बातम्या /बातम्या /मनी /1 मेपासून बदणार हे 5 नियम; गॅस सिलेंडरपासून बँकिंग नियमांमध्ये होणार असे बदल

1 मेपासून बदणार हे 5 नियम; गॅस सिलेंडरपासून बँकिंग नियमांमध्ये होणार असे बदल

1 मे पासून (Changes From 1 May) सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमांमध्ये बँकिग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder), कोरोना लसीकरण (Covid Vaccination) आणि इतर काही नियमांचा समावेश आहे.

1 मे पासून (Changes From 1 May) सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमांमध्ये बँकिग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder), कोरोना लसीकरण (Covid Vaccination) आणि इतर काही नियमांचा समावेश आहे.

1 मे पासून (Changes From 1 May) सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमांमध्ये बँकिग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder), कोरोना लसीकरण (Covid Vaccination) आणि इतर काही नियमांचा समावेश आहे.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल: 1 मे पासून (Changes From 1 May) सर्वसामान्य जनतेसाठी अनेक नवे नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमांमध्ये बँकिग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder), कोरोना लसीकरण (Covid Vaccination) आणि इतर काही नियमांचा समावेश आहे. या नियमांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

    1. Axis Bank करणार 'हे' बदल

    अ‍ॅक्सिस बँकने 1 मे पासून खात्यात कमीत कमी किती रक्कम ठेवावी, या बद्दलचा नियम बदलला आहे. या सोबतच, 1 मे पासून तुम्हाला 'फ्री लिमिट' नंतर एटीएममधून पैसे काढायचे असल्यास आताच्या तुलनेत दुप्पट चार्ज द्यावा लागणार आहे. तसंच बँकेने इतर सुविधांसाठी लागणारे चार्जेसही बदलले आहे. बँकेने खात्यामध्ये कमीत-कमी सरासरी शिल्लक रक्कम किती असावी या बाबतचा नियमही बदलला आहे. 'ईजी सेव्हिंग स्कीम्स'वाल्या खात्यांमध्ये यापूर्वी कमीत कमी 10 हजार रुपये असणं आवश्यक होतं. ही मर्यादा आता 15 हजार रुपये करण्यात आली आहे.

    2. 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांचं लसीकरण -

    देशात 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं 1 मेपासून लसीकरण (COVID-19 vaccination) केलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सरकारने आधीचे नियम बदलले असून अनेक नवीन नियम आणले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला सरकारने अनिवार्य केलंय.

    3. इरडाने पॉलिसी कव्हर रक्कम दुप्पट केली -

    विमा नियामक इरडाने आरोग्य संजीवनी योजनेची कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांना 1 मेपर्यंत 10 लाखांपर्यंतच्या कव्हर असणाऱ्या योजना सादर कराव्या लागतील. गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी स्टँडर्ड योजनेची जास्तीत जास्त कव्हरेज रक्कम ही 5 लाख रुपये होती.

    (वाचा - बंद झालेल्या खात्यामध्ये अद्यापही जमा आहे रक्कम? कधीही काढता येतील हे पैसे)

    4. गॅस सिलेंडरच्या दरात बदल -

    सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल करतात. 1 मे रोजी गॅस सिलेंडरच्या नव्या किमती येतील. या किमती वाढ किंवा घट होते. त्यामुळे या महिन्यात गॅस सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागतील, हे 1 मे रोजी कळेल.

    (वाचा - दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत)

    5. मे महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद -

    मे महिन्यात 12 दिवस बँका (Bank Holidays In May 2021) बंद राहणार आहेत. यापैकी काही दिवशी देशभरात नव्हे, तर काही राज्यांमध्येच बँका बंद राहतील. आरबीआईच्या वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या लिस्टमधील काही सुट्ट्या या फक्त त्या त्या राज्यांसाठी असतात, देशव्यापी नसतात.

    First published:

    Tags: Axis Bank, Coronavirus, LPG Price, Money