मराठी बातम्या /बातम्या /मनी /गंगा विलास क्रूझ दोनच दिवसात नदीच्या मधोमध अडकलं, कारण आलं समोर

गंगा विलास क्रूझ दोनच दिवसात नदीच्या मधोमध अडकलं, कारण आलं समोर

ganga vilas cruise

ganga vilas cruise

गंगा विलास क्रूझ बिहारमधून पुढे जाण्यासाठी अडथळा येत असल्याची माहिती मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

मुंबई : जगातील सर्वात लांब नद्यांचा प्रवास करून जाणाऱ्या अलिशान गंगा विलास क्रूझला सुरू होऊन दोनच दिवस होतात तोच आता अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. गंगा विलास क्रूझ बिहारमध्ये पोहोचताच नदीच्या मधोमध अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गंगा विलास क्रूझ बिहारमधून पुढे जाण्यासाठी अडथळा येत असल्याची माहिती मिळाली आहे. वाराणसीमधून 13 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्रूझला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला होता. त्यानंतर दोन दिवसात गंगा विलास क्रूझमधील पर्यटकांसमोर एक संकट उभं राहिलं आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

Ganga Vilas : घरबसल्या घ्या जगातली सर्वात लांब आणि अलिशान river cruise चा आनंद पाहा PHOTO

नक्की क्रूझला काय झालं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या छापरा भागात डोरीगंज भागात गंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक कमी झाली. त्यामुळे क्रूझ पुढे जाण्यात अडथळा निर्माण होत होता. क्रूझ किनाऱ्याला आणणं शक्य होत नव्हतं. याबाबत सूचना मिळताच प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आणि तातडीने प्रवाशांना होडीतून किनाऱ्यावर आणण्यात आलं.

छपरा इथून 11 किमीवर असलेल्या डोरीगंज बाजारवर चिरांद सारण जिल्ह्याजवळ या क्रूझला जायचं होतं. तिथे एक पुरातत्व मंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक उतरणार होते. मात्र त्याआधीच क्रूझला अडथळा निर्माण झाला.

Ganga vilas : बनारस ते दिब्रुगड क्रूझचे एका दिवसाचं तिकीट किती? पाहा फोटो

अलिशान असलेल्या या क्रूझचं तिकीट एका रात्रीचं 50 हजार रुपये आहे. तर 51 दिवसांची ही सफर असणार आहे. या क्रूझमध्ये आता 31 परदेशी पर्यटक प्रवास करत आहेत. त्यांना होडीमधून आता पर्यटनस्थळी पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. गंगा विलास क्रूझ सुरू होऊन दोन दिवस झाले आणि त्यानंतर लगेच अडथळा निर्माण झाल्याने पर्यटकांन त्रास सहन करावा लागला आहे.

First published:

Tags: Bihar