मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Price Today: महिनाभराने स्वस्त झालं डिझेल, वाचा काय आहेत आजचे इंधनाचे भाव

Petrol Diesel Price Today: महिनाभराने स्वस्त झालं डिझेल, वाचा काय आहेत आजचे इंधनाचे भाव

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी 18 ऑगस्ट रोजी इंधनाच्या दरात बदल केले आहेत. आज डिझेलच्या दरात घट झाली असून पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी 18 ऑगस्ट रोजी इंधनाच्या दरात बदल केले आहेत. आज डिझेलच्या दरात घट झाली असून पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

Petrol Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी 18 ऑगस्ट रोजी इंधनाच्या दरात बदल केले आहेत. आज डिझेलच्या दरात घट झाली असून पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी 18 ऑगस्ट रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी (Petrol-Diesel Price Today) केले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज इंधनाच्या दरात बदल झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून इंधनाचे दर स्थिर होते, आज यामध्ये काहीसा बदल झाला आहे. आज डिझेलच्या दरात घट झाली असून पेट्रोलचे दर अद्यापही स्थिर आहेत. देशातील काही मुख्य शहरात डिझेलचे दर 20 पैशांपर्यंत कमी झाले आहेत. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. 18 जुलैपासून इंधनाचे दर स्थिर होते. शेवटी पेट्रोलचे दर 17 जुलै रोजी वधारले होते. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ पाहायला मिळाली होती, तर डिझेलचे दर स्थिर होते. दरम्यान आज डिझेलचे दर 20 पैशांनी कमी झाले आहेत. महत्त्वाच्या शहरातील आजचे इंधनाचे दर >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.24 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.47 रुपये आणि डिझेल 94.20 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 92.82 रुपये प्रति लीटर >> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.46 रुपये प्रति लीटर हे वाचा-HDFC बँकेला पुन्हा जारी करता येणार नवीन क्रेडिट कार्ड, RBIचा मोठा दिलासा >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.05 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.06 रुपये प्रति लीटर >> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.31 रुपये प्रति लीटर >> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 98.81 रुपये प्रति लीटर >> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रति लीटर हे वाचा-दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000,काय आहे मोदी सरकाची योजना? इंधनाचे दर तपासण्यासाठी काय कराल? पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut, Petrol price

    पुढील बातम्या