फक्त डिश आणि किंमत नाही तर तो पदार्थ किती पोषक; Menu card वरच मिळणार माहिती

रेस्टोरंटच्या मेन्यू कार्डमध्ये आता खाण्याच्या न्यूट्रिशनची व्हॅल्यू लिहिणं गरजेचं असणार आहे. यामुळे ग्राहकांना आपण खात असलेल्या पदार्थात किती कॅलरी आहे, याची माहिती मिळेल. एवढंच नाही तर, मेन्यू लेबलिंग करताना पोषण तत्वाचं प्रमाणही लिहिणं आवश्यक असणार आहे.

रेस्टोरंटच्या मेन्यू कार्डमध्ये आता खाण्याच्या न्यूट्रिशनची व्हॅल्यू लिहिणं गरजेचं असणार आहे. यामुळे ग्राहकांना आपण खात असलेल्या पदार्थात किती कॅलरी आहे, याची माहिती मिळेल. एवढंच नाही तर, मेन्यू लेबलिंग करताना पोषण तत्वाचं प्रमाणही लिहिणं आवश्यक असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 डिसेंबर : भारतीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाने (FSSAI) एक मोठं पाऊल उचलत, मेन्यू लेबलिंगचा नियम तयार केला आहे. ज्याअंतर्गत रेस्टोरंटच्या मेन्यू कार्डमध्ये आता खाण्याच्या न्यूट्रिशनची व्हॅल्यू लिहिणं गरजेचं असणार आहे. यामुळे ग्राहकांना आपण खात असलेल्या पदार्थात किती कॅलरी आहे, याची माहिती मिळेल. एवढंच नाही तर, मेन्यू लेबलिंग करताना पोषण तत्वाचं प्रमाणही लिहिणं आवश्यक असणार आहे. केंद्र सरकारने नवं लेबलिंग आणि डिस्प्ले रेग्युलेशन जारी केलं आहे. त्यानुसार, 10 हून अधिक चेन असणाऱ्या रेस्टोरंट्सना हे लागू असणार आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अनेक काळापासून लेबलिंग रेग्युलेशन करण्याच्या प्रयत्नात होते. आता याला नोटिफाय करण्यात आलं आहे. 10 हून अधिक ब्राँच असणाऱ्या रेस्टोरंट्सवर नियम लागू - FSSAI चा हा नवा नियम 10 हून अधिक चेन असणाऱ्या रेस्टोरंट्सवर लागू आहे. त्या हिशोबाने सेंट्रल लायसन्स घेऊन 10 हून अधिक जागांवर रेस्टोरंट्स चालवणाऱ्या कंपन्यांसाठी मेन्यू कार्डमध्ये कॅलरीसंबंधी माहिती देणं आवश्यक झालं आहे. त्याशिवाय कोणत्या व्यक्तीसाठी किती प्रमाणात कॅलरी असणं आवश्यक आहे, हेदेखील लिहावं लागेल.

  (वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)

  भारत सरकारच्या या नोटिफिकेशनच्या हिशोबाने मेन्यू कार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा बुकलेटमध्ये पदार्थांसह त्याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यूबाबत माहिती देणं गरजेचं झालं आहे. पिज्जा, बर्गरची विक्री करणाऱ्या फूड चेन पिज्जा हट, मॅकडोनाल्ड यांसारख्या कंपन्यांना आपल्या फूड कॅलरीची माहिती द्यावी लागेल. 100 ग्रॅम बर्गरमध्ये 295 कॅलरी - एका 100 ग्रॅम पिज्जामध्ये 260 कॅलरीज असतात. तर एका 100 ग्रॅम बर्गरमध्ये 295 कॅलरी असतात. एका प्रोढ व्यक्तीला दिवसाला सरासरी 2000 कॅलरी एनर्जीची जरूरत असते. कामाच्या हिशोबानुसार, लोकांची कॅलरीची गरज वेगवेगळी असू शकते. प्रत्येक खाद्यपदार्थावर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू लिहिली असल्याने, प्रत्येक व्यक्तीला कॅलरीजची माहिती मिळू शकेल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: