Home /News /money /

आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे बदल

आजपासून बंद होणार 94 वर्ष जुनी बँक, ग्राहक आणि गुंतवणुकदारांसाठी होणार असे बदल

कॅबिनेटच्या मंजुरीनंतर लक्ष्मी विलास बँक (Lakshmi Vilas Bank) सिंगापूरच्या सर्वात मोठी बँक असणाऱ्या डीबीएसच्या भारतीय शाखेत (DBS India) विलीन होईल. लक्ष्मी विलास बँक वाचविण्यासाठी आरबीआयने (RBI) डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 27  नोव्हेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या लक्ष्‍मी विलास बँकेवर (Lakshmi Vilas Bank) सुरुवातीला निर्बंध लादले आले होते आणि त्यांनंतर डीबीएस इंडिया (DBS India) मध्ये विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. आजपासून विलीनीकरण लागू होत आहे. या निर्णयानंतर 94 वर्षं जुन्या असणाऱ्या लक्ष्मी विलास बँकेचे नाव संपुष्टात येणार आहे. सिंगापूरमधील DBS बँकेबरोबर या LVB चे विलीनीकरण (Merger in DBS Bank) होत आहे. अंतिम स्कीम अंतर्गत लक्ष्मी विलास बँकेचे अस्तित्त्व 27 नोव्हेंबर अर्थात आजपासून संपणार आहे आणि या बँकेचे शेअर्स देखील डीलिस्ट होणार आहेत या निर्णयामुळे 20 लाख ठेवीदार आणि बँकेच्या 4000 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हणाले. याशिवाय बँकेच्या खात्यातून जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढण्याची मर्यादाही दूर करण्यात आली आहे. शुक्रवारपासून या बँकेचे ग्राहक डीबीएस इंडिया बँकेचे ग्राहक म्हणून आर्थिक व्यवहार करू शकतात. बेलआउट पॅकेज अंतर्गत लक्ष्मी विलास बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळतील. जर ते बँकेत त्यांचे पैसे यापुढेही ठेवू इच्छितात तर ते देखील सुरक्षित राहतील, असा दिलासा देण्यात येत आहे. (हे वाचा-कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार मोदी सरकार, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा) तुमचे पैसे पुर्णपणे सुरक्षित बँकेकडून त्यांच्या ग्राहकांना असा विश्वास देण्यात आला आहे की, सध्याच्या संकटकाळातही त्यांच्या जमा रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही आहे. बँकेने असे म्हटले आहे की 262 टक्क्यांच्या एलसीआर सह ठेवीदार, बाँडधारक, खातेधारक आणि कर्जदारांची संपत्ती पूर्णपणे सुरक्षित आहे. आर्थिक संकटाची सुरुवात कधीपासून? 4-5 वर्षांपासून लक्ष्मी विलास बँकेने रिटेल, MSME आणि SME त्याचप्रमाणे मोठी कर्ज अवाजवी स्वरुपात वाटायला सुरुवात केली. यानंतरच बँकेसमोर संकट वाढण्यास सुरुवात झाली. अर्थव्यवस्थेमध्ये तेजी न आल्यामुळे बँकेने दिलेले कर्ज NPA नाही बनलं. (हे वाचा-भारतामध्ये मोफत असेल Google Pay,या देशामध्ये मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क) विश्लेषकांच्या मते, अंदाजे 3000-4000 कोटींचे कॉर्पोरेट कर्ज 'बॅड लोन' आहे. एनपीए खूप जास्त वाढल्यामुळे सप्टेंबर 2019 मध्ये आरबीआयला प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) फ्रेमवर्क अंतर्गत मोठी पावलं उचलावी लागली. 2018-2019 मध्ये बँकेचे 894 कोटींचे नुकसान झाले होते. किती होत आहे नुकसान? गेल्या 10 तिमाहींपासून बँकेचे सातत्याने नुकसान होत आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कर भरल्यानंतर बँकेचा नेट लॉस 396.99 कोटी रुपये इतका होता. एक वर्ष आधी याच तिमाहीमध्ये बँकेचा नेट लॉस 357.18 कोटी रुपये होता. 94 वर्षं जुनी बँक 94 वर्ष जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या (एलव्हीबी) व्यवस्थापनामध्ये गोंधळ बऱ्याच काळापासून सुरू होता. बँक गेल्या काही वर्षांपासून भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु यामध्ये बँकेला यश मिळाले नाही. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीत विलीनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयने 2019 मध्ये फेटाळला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या