• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • LIC चा इशारा! चुकूनही करू नका हे काम, आता होणार कायदेशीर कारवाई

LIC चा इशारा! चुकूनही करू नका हे काम, आता होणार कायदेशीर कारवाई

यापुढे जर LIC कंपनीच्या परवानगीशिवाय (without permission) कोणीही त्यांचा लोगो (LIC LOGO) वापरल्यास ते अडचणीत येऊ शकतात. एलआयसीने नेमकं काय म्हटलं आहे? वाचा.. 

  • Share this:
नवी दिल्ली, 13 जून: भारतीय जीवन विमा निगमने (LIC) नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. हा इशारा त्यांच्या ग्राहकांसाठी (customer) नसून कंपनीचा लोगो वापरणार्‍या लोकांसाठी आहे. यापुढे जर कंपनीच्या परवानगीशिवाय (without permission) कोणीही त्यांचा लोगो (LOGO) वापरल्यास ते अडचणीत येऊ शकतात. जे लोक विमा कंपनीच्या परवानगीशिवाय कंपनीचा लोगो (Logo) बिझनेस किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरतील, LIC अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करेल. याबाबत ट्विट करून एलआयसीने लोकांना इशारा दिला आहे.  चला तर जाणून घेऊया एलआयसीने नेमकं काय म्हटलं आहे. हे ही वाचा: कोरोना काळात महागाईनं मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; किराणा 50 टक्क्यांनी महाग एलआयसीने ट्विट मध्ये काय म्हटलंय? LIC ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की परवानगीशिवाय कोणतीही वेबसाइट (website), पब्लिशिंग मटेरियल (Publishing material) किंवा डिजिटल पोस्टमध्ये (Digital post) एलआयसीच्या लोगोचा (LIC Logo) वापर करू शकत नाही हे बेकायदेशीर आहे. असं करणाऱ्या लोकांवर दिवाणी आणि फौजदारी कायद्यांतर्गत (criminal law) कायदेशीर कारवाई केली जाईल. बऱ्याचदा लोक स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी एलआयसी सारख्या मोठ्या कंपन्यांचे लोगो होर्डिंगमध्ये (holdings) वापरतात. मात्र, यापूढे असं केल्यास एलआयसीकडून कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सगळ्यांनीच खूप सावधानता बाळगणं आवश्यक आहे. हे ही वाचा: हुश्श! 'वाईट काळ संपला'; कोरोनाबाबत केंद्र सरकारने दिली पॉझिटिव्ह न्यूज LIC ने फ्रॉड मेसेजच्या बाबतीतही दिला इशारा - कोरोना काळात फसवणुकीच्या (fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या पूर्वी बऱ्याचदा एलआयसीने (LIC-Life Insurance Corporation of India) त्यांच्या ग्राहकांना फ्रॉड मेसेजसाठी अलर्ट (fraud message alert) जारी केला आहे. LIC ने म्हटलंय की, पॉलिसीबाबत (policy) खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या लोकांपासून ग्राहकांनी सावध राहावं. याशिवाय फसवणूक करणारे लोक ग्राहकांना LIC अधिकारी, IRDAI अधिकारी असल्याचं सांगत फसवतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून (unknown number) अशा प्रकारचे फोन किंवा मेसेज आल्यास ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. एलआयसी त्यांच्या अधिकृत नंबरशिवाय तुमच्याशी संपर्क साधत नाही, त्यामुळे सावध रहा, असं एलआयसीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात पॉलिसीची रक्कम (Policy Claim) लगेच मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे. ग्राहकांना त्यांन‍ा त्यांच्या एलआयसी पॉलिसीबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांनी एलआयसी कर्मचारी (LIC employee) किंवा कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन त्यानी केलं आहे. एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी सरकारी विमा कंपनी आहे त्यामुळे देशभर त्यांचं जाळं विस्तारलेलं आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातही एलआयसीचा लोगो आपल्याला दिसतो त्याचा गैरवापर करू नये एवढीच कंपनीची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी हा इशारा दिला आहे.
Published by:Prem Indorkar
First published: