मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गाडी चालवताना खिशात लायसन्स नसेल तरी नो टेन्शन! आजपासून बदलला हा नियम

गाडी चालवताना खिशात लायसन्स नसेल तरी नो टेन्शन! आजपासून बदलला हा नियम

वाहन चालवताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर आणि यावेळी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरीच विसरला आहात, तर आता अजिबात घाबरायची गरज नाही.

वाहन चालवताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर आणि यावेळी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरीच विसरला आहात, तर आता अजिबात घाबरायची गरज नाही.

वाहन चालवताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर आणि यावेळी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरीच विसरला आहात, तर आता अजिबात घाबरायची गरज नाही.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : एखादं वाहन चालवताना तुम्हाला पोलिसांनी अडवलं आणि यावेळी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरीच विसरला आहात, तर अजिबात घाबरायची गरज नाही. कारण आता लायसन्स बरोबर न बाळगल्याबद्दल पोलीस तुम्हाला दंड करू शकणार नाहीत. 1 ऑक्टोबर 2020 पासून देशात लागू होणाऱ्या कायद्यानुसार वाहन चालकाला त्याचं लायसन्स, गाडीच्या देखभालीची कागदपत्रं सोबत बाळगायची गरज नाही. परिवहन विभागाच्या वेबसाइटवर वाहन चालकाचं लायसन्स आणि गाडीसंबंधीची माहिती डिजिटल स्वरूपात अपलोड केली जाणार आहेत. त्याचबरोबर काही नियमभंगाबद्दल पोलिसांनी केलेली दंडाची पावतीही (ई-चलन) परिवहन विभागाच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी पोर्टलवर उपलब्ध असेल.

केंद्र सरकाने कागदपत्र डिजिटायझेशनच्या सुरू केलेल्या योजनेअंतर्गत हे बदल केले जात आहेत. समजा तुम्हाला पोलिसांनी अडवलं तर ते या वेबसाइटवर जाऊन तुमचं लायसन्स, देखभालीची कागदपत्रं डिजिटल स्वरूपात तपासून बघतील. त्यामुळे या नव्या नियमानुसार ते या कागदपत्रांच्या छापील प्रतींची तुमच्याकडे मागणी करू शकत नाहीत. जर त्या अधिकाऱ्याने तुमचा परवाना रद्द केला किंवा त्यासंबंधी काही कारवाई केली तरीही ती अगदी तारीख, वार, वेळ, ठिकाणासह वेबसाइटवर नोंदवली जाणार आहे.

(हे वाचा-3 मित्रांनी 4 वर्षात प्रसिद्ध केला कॉफी ब्रँड, आहे कोट्यवधींची कमाई)

‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग (MoRTH) मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 (Central Motor Vehicle Rules 1989)  मध्ये केलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासंबंधी परिपत्रकं नुकतेच प्रसिद्ध केले आहे. यापैकी वाहनाच्या देखभालीची कागदपत्रं आणि ई-चलन तपासणीसंबंधी कायद्यातील सुधारणेची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 20 पासून केली जाणार आहे,’  असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. आयटी सेवा आणि इलेक्ट्रॉनिक तपासणीमुळे देशात वाहतुकीच्या नियमांची अधिक चांगल्या पद्धतीनी अंमलबजावणी करता येईल आणि वाहन चालकांची पिळवणूकही कमी होईल असंही यात म्हटलं आहे.

(हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आता कपात होणार नाही? वाचा काय आहे सत्य)

मोटर वाहन कायदा (सुधारणा) 2019 (Motor Vehicles Amendment Act 2019) पारित होऊन 9 ऑगस्ट 2019 ला जाहीर करण्यात आला होता. वाहन चालकावर झालेली कारवाई, त्याचं लायसन्स रद्द झालं असेल किंवा ते जप्त झालं असेल तर त्यासंबंधीची माहिती कालसुसंगत पद्धतीने या आयटी पोर्टलवर नोंदवली गेली पाहिजे आणि ती वेळोवेळी अपडेटही केली पाहिजे असंही या सुधारणेत म्हटलं आहे. या माहितीवरून चालकाच्या वाहतुकीसंबंधी वर्तनावर परिवहन विभागाला लक्ष ठेवता येईल. या कागदपत्रांची वैधता, ती जारी करण्याची तारीख याचं प्रमाणपत्र छापील तसंच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. कागदपत्रं तपासण्याची वेळ आणि तपासणाऱ्या परिवहन अधिकारी किंवा राज्य सरकारच्या अधिकृत अधिकाऱ्याचं नावही या वेबसाइटवर नोंदवलं जाईल.

जर तपासणी अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनी कागदपत्रं तपासली तर त्यानी छापील कागदपत्रांची मागणी करता कामा नये. एखाद्या वाहनाची चोरी झाली तर चौकशीसाठी पोलीस छापील कागदपत्रं मागू शकतात असंही या नव्या विधेयकाबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

वाहन चालवताना या कारणासाठी मोबाइल वापरण्यास परवानगी

या नियमांमुळे वाहनचालकांचा फायदा होणार आहे. तपासणी अधिकाऱ्याच्या नावाची नोंद पोर्टलवर होणार असल्यामुळे परिवहन यंत्रणेतून त्याच्या कामावरही लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रं तपासणी करून पोलीस वाहनचालकांची पिळवणूक करू शकणार नाहीत. आणखी महत्त्वाचं म्हणजे जर हातात मोबाईल धरून रूट नेव्हिगेशन मॅप पाहून वाहनचालकाला वाहन चालवण्यास सूट देण्यात आली आहे. मोटर वाहन (ड्रायव्हिंग) सुधारणा 2017 (Motor Vehicles (Driving) Regulations 2017 )नुसार सरकारने केवळ त्या कारणासाठी गाडी चालवताना मोबाइल हाता घेण्यास परवानगी दिली आहे. त्यातही गाडी चालवण्यास अडथळा होणार नाही अशी काळजी घेत नेव्हिगेशनचा वापर करणं बंधनकारक आहे. फोनवर गप्पा मारत गाडी चालवल्यास दंड आहे.

First published:

Tags: Traffic, Traffic Rules