मराठी बातम्या /बातम्या /मनी /Smart TV घेणार असाल तर उशीर नको; पुढच्या महिन्यात वाढणार किमती

Smart TV घेणार असाल तर उशीर नको; पुढच्या महिन्यात वाढणार किमती

TV prices hike: गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत सुमारे 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी स्मार्ट टीव्हीची किंमत 3000 वरुन 4000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ती 1 एप्रिलपासून आणखी वाढणार आहे.

TV prices hike: गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत सुमारे 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी स्मार्ट टीव्हीची किंमत 3000 वरुन 4000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ती 1 एप्रिलपासून आणखी वाढणार आहे.

TV prices hike: गेल्या 8 महिन्यांत टीव्हीच्या किंमतीत सुमारे 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी स्मार्ट टीव्हीची किंमत 3000 वरुन 4000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ती 1 एप्रिलपासून आणखी वाढणार आहे.

    नवी दिल्ली, 6 मार्च: जर तुम्ही स्मार्ट टीव्ही (Smart TV) खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर विचार करण्यापेक्षा तातडीनं खरेदी करा. अन्यथा तुम्ही जर तो पुढील महिन्यात खरेदी केला तर तुम्हाला जादा किंमत मोजावी लागेल. 1एप्रिल 2021 पासून स्मार्ट टीव्हीची किंमत वाढत (Price Hike) आहेत. सध्या असलेल्या किमतीत 2000 ते 3000 रुपयांनी वाढ अपेक्षित आहे. देशात स्मार्ट टीव्हीचे दर वेगाने वाढत आहेत. गेल्या 8 महिन्यात स्मार्ट टिव्हीच्या किमतीत 300 टक्क्यांनी वाढ झालीय. या कालावधीत स्मार्ट टीव्हीच्या किमती 3000 ते 4000 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यातच पुढील महिन्यात या किमती 2000 ते 3000 रुपयांनी वाढणार आहेत.

    किमती वाढण्याचे कारण काय?

    टीव्ही पॅनेलच्या (TV Panel) किमती यापूर्वीच 300 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट टीव्हीच्या मागणीतील वाढ ही 5 टक्क्यांच्या अतिरिक्त वाढीसह नोंदवली जाऊ शकते. याचं प्रमुख कारण म्हणजे जागतिक विक्रेत्यांकडून कमी पुरवठा हे आहे. या व्यतिरिक्त कस्टम ड्युटीतील वाढ,तांबे,ॲल्युमिनियम आणि स्टील या सामुग्रीत झालेली वाढ देखील यासाठी कारणीभूत आहे. ही स्थिती पाहता सरकारने इलेक्ट्रॉनिक पार्टसवरील कस्टम ड्युटीत (Custom Duty)केलेल्या वाढीबाबत पुनर्विचार करावा,असे तज्ज्ञांचे मत आहे.

    हे वाचा -   इंडियन बँकेची तब्बल 35 कोटींची फसवणूक; 'या' 3 NPA खात्यांमधून झाला फ्रॉड

    गतवर्षी लॉकडाऊनमुळे (Lock Down)लोक घरातच होते. त्यामुळे कंटाळा दूर करण्यासाठी अनेकांना स्मार्ट टिव्ही गरजेचा आहे अशी जाणीव झाली. त्यामुळे लॉकडाऊननंतरच्या काही महिनेपश्चात स्मार्ट टिव्हीच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली. सरकारने ग्रीन आणि आरेंज झोन खुले केले त्यानंतर स्मार्ट टिव्ही विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारच्या मार्गदर्शनुसार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील स्मार्ट टिव्हीला मागणी वाढल्याचं दिसून आलं.

    स्मार्ट टीव्हीकरिता पीआयएल योजना लागू होऊ शकते

    कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये(Consumer Electronic Market)टिव्हीला सर्वाधिक मागणी आहे. याचा मार्केट पेनेट्रेशन रेट हा जवळपास 85 टक्के आहे. त्यामुळे टेलिव्हिजन उत्पादकांकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यात जगभरातील प्रसिध्द ब्रॅण्डसचा देखील समावेश आहे. अशा ब्रॅण्डस नेहमीच स्थानिक पार्टनरची गरज असते. त्यामुळे या क्षेत्राला फायदा व्हावा आणि उद्योग नफ्यात यावा याकरिता टिव्ही उत्पादक कंपन्या पीएलआय योजना लागू करण्याची मागणी सरकारकडं करीत आहेत.

    First published:

    Tags: Money, Technology, Tv