मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC ग्राहकांसाठी मोठी बातमी; आजपासून नवा नियम लागू, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम

LIC ग्राहकांसाठी मोठी बातमी; आजपासून नवा नियम लागू, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम

10 मे, आजपासून LIC च्या सर्व ऑफिसमध्ये 5 दिवसचं (5-Days Working) काम सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार ऑफिस पूर्णपणे बंद राहणार आहे.

10 मे, आजपासून LIC च्या सर्व ऑफिसमध्ये 5 दिवसचं (5-Days Working) काम सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार ऑफिस पूर्णपणे बंद राहणार आहे.

10 मे, आजपासून LIC च्या सर्व ऑफिसमध्ये 5 दिवसचं (5-Days Working) काम सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार ऑफिस पूर्णपणे बंद राहणार आहे.

नवी दिल्ली, 10 मे: एलआयसीमध्ये (LIC) आजपासून एक मोठा बदल लागू करण्यात आला आहे. जर तुम्हाला एलआयसी ऑफिसमध्ये जायचं असेल किंवा यासंबंधी कोणतं काम करायचं असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 10 मे, आजपासून LIC च्या सर्व ऑफिसमध्ये 5 दिवसचं (5-Days Working) काम सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार ऑफिस पूर्णपणे बंद राहणार आहे.

कंपनीच्या एका सार्वजनिक नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल 2021 च्या अधिसूचनेमध्ये भारत सरकारने, एलआयसीसाठी प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

सरकारने हा बदल नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्ट 1881 च्या कलम 25 अंतर्गत केला आहे. जर तुमचं LIC ऑफिसमध्ये काही काम असेल, तर त्यासाठी आता सोमवार ते शुक्रवार या दरम्यानच जावं लागेल. एलआयसी ऑफिस आठवड्यातून पाच दिवस सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरू राहणार आहेत.

LIC याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहीराती देऊन माहिती देत आहे, जेणेकरुन ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. 15 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सरकारच्या घोषणेनुसार, LIC ऑफिस 10 मेपासून दर शनिवारी आणि रविवारी बंद राहतील.

(वाचा - मोदी सरकारची मोठी घोषणा;नोकरदार वर्गाला फ्रीमध्ये मिळणार 7लाख रुपयांची ही सुविधा)

LIC आपल्या ग्राहकांना ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देते. यासाठी अधिकृत वेबसाईट https://licindia.in/ वर ऑनलाईनही कामं करता येऊ शकतात.

(वाचा - तुमच्याकडे 1 रुपयाची नोट आहे? घरबसल्या 45 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम)

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या LIC ने कोरोना संकटात काही नियम शिथिल केले आहेत. कोरोनामध्ये एखाद्या ग्राहकाचा मृत्यू रुग्णालयात झाल्यास, म्युनिसिपल डेथ सर्टिफिकेटच्या जागी कोणतंही डेथ सर्टिफिकेट, डिस्चार्ज समरी, मृत्यू झाल्याची वेळ आणि तारीखेसह डेथ समरी, जी सरकार ईएसआय, आर्म्ड फोर्सेस, कॉर्पोरेट हॉस्पिटल, एलआयसी क्लास-1 अधिकारी किंवा 10 वर्षांचा अनुभव असणारे डेव्हलपमेंट ऑफिसर, अंतिम संस्कार सर्टिफिकेट देऊन क्लेम करू शकतात.

First published:

Tags: Investment, LIC, Money