• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 1 ऑक्टोबरपासून या दोन बँकांचे चेकबुक ठरणार अमान्य, लगेच करा अपडेट

1 ऑक्टोबरपासून या दोन बँकांचे चेकबुक ठरणार अमान्य, लगेच करा अपडेट

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मर्ज झाल्या आहेत. त्यामुळे या दोन बँकांचं जुनं चेकबुक वैध राहणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : अनेक बँकांच्या विलनीकरणानंतर (Bank Merger) बँकांसंबंधित अनेक नियम बदलले आहेत. आयएफएससी कोड, चेकबुक बाबतचे नियम बदलले आहेत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मर्ज झाल्या आहेत. त्यामुळे या दोन बँकांचं जुनं चेकबुक वैध राहणार नाही. बँका मर्ज झाल्यानंतर आता ग्राहकांना नवं चेकबुक घ्यावं लागेल. ग्राहक 1 ऑक्टोबरनंतर जुन्या चेकबुकचा वापर करू शकणार नाहीत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या दोन बँकांना PNB बँकेचं चेकबुक घ्यावं लागेल. PNB ने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांच्या चेकबुकला 1 ऑक्टोबरपासून मान्यता नसणार. त्यामुळे IFSC आणि MICR द्वारे ग्राहकांनी चेकबुक बदलून PNB चं चेकबुक घ्यावं. बँकेने या बदलाची माहिती ग्राहकांना SMS द्वारेही दिली आहे.

  सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावलेल्यांना पुढील जूनपर्यंत मिळणार या स्किमचा फायदा

  काय असेल प्रक्रिया - ग्राहक नव्या चेकबुकसाठी ATM, इंटरनेट बँकिंग आणि PNB कॉल सेंटरद्वारे अर्ज करू शकतात. ग्राहक जवळच्या ब्राँच किंवा PNB ONE App वरुनही चेकबुकसाठी अप्लाय करू शकतात. तसंच PNB टोल फ्री नंबर 1800-180-2222 वर कॉल करुन नव्या चेकबुकसंबंधी समस्यांचं निराकरण करू शकतात.
  Published by:Karishma
  First published: