नवी दिल्ली, 1 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर हळू-हळू कमी होत आहे. अनेक राज्यांनी लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. SBI ने आपल्या कामाच्या वेळेत बदल केले आहेत. आधी SBI ब्राँच सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असायची. आता या वेळेत आणखी दोन तास वाढवण्यात आले आहेत. आता SBI बँक ब्राँच संध्याकाळी 4 वाजेपर्यत सुरू राहतील.
कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता बँकेने कामाची वेळ कमी केली होती. परंतु आता कोरोनाच्या दररोजच्या केसेसमध्ये कमी येत असल्याने कामाची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. ग्राहक सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेसंबंधी कामं करू शकतील. 1 जूनपासून सर्व एसबीआय ब्राँच 10 ते 4 सुरु राहतील असं ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे.
Now, as per SLBC instructions, our branch is functioning to render customer services from 10 a.m. to 4.00 p.m. w.e.f. 01.06.2021
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 1, 2021
त्याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवं नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये पैसे काढण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आलं आहे. या नव्या नोटिफिकेशननुसार, बँकेकडून आता होम ब्राँच नसलेल्या इतर ब्राँचमधून रोख पैसे (Cash Withdrawal) काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ग्राहक Non-Home ब्राँचमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत.
चेकद्वारे Non-Home ब्राँचमधून कॅश काढण्याची मर्यादा 1 लाखांपर्यंत आहे. तसंच, थर्ड पार्टी अर्थात ज्याला चेक दिला आहे, त्यांच्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. हा नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.