नवी दिल्ली, 26 मार्च : आठवडाभरात नवीन एप्रिल महिन्यात प्रवेश होईल. येणाऱ्या 1 एप्रिल 2021 (1 April 2021) पासून सामन्यांवर चांगलाच आर्थिक बोजा पडू शकतो. एकीकडे दररोजच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य हैराण असताना, आता दुसरीकडे 1 एप्रिलपासून दूध (Milk), एअर कंडिशनर (AC), पंखा (Fan), टीव्ही (TV), स्मार्टफोन्सच्या (Smartphones) किंमती वाढणार आहे. तसंच विमान प्रवास, टोल टॅक्ससाठीही अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
1 एप्रिलपासून 3 रुपयांनी वाढणार दुधाचे दर -
दुधाचे दर वाढवण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी दुधाचे दर 55 रुपये प्रति लीटर वाढवण्याचं सांगितलं आहे. परंतु व्यापाऱ्यांनी 3 रुपये दर वाढवण्याचं म्हटलं आहे. वाढलेले दर 1 एप्रिलपासून लागू होतील. म्हणजेच 1 एप्रिलपासून दूध 49 रुपये प्रति लीटर होईल.
एक्सप्रेस-वेवर प्रवास करणं महागणार -
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर (Agra Lucknow Expressway) प्रवास करणं महागणार आहे. उत्तर प्रदेश एक्सप्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरण बोर्डने (Uttar Pradesh Expressways Industrial Development Authority) 2021-22 साठी नव्या दरांना मंजुरी दिली आहे. कमीत-कमी 5 रुपये आणि अधिकाधिक 25 रुपयांची वाढ केली जाईल. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील.
विमान प्रवास -
विमान प्रवासासाठी आता अधिक खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारने डोमॅस्टिक फ्लाईट्सचं भाडं लोअर लिमिट 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 एप्रिलपासून एव्हिएशन सिक्योरिटी फीस अर्थात एएसएफ (Aviation Security Fees)वाढणार आहे. 1 एप्रिलपासून डोमॅस्टिक फ्लाईट्ससाठी एव्हिएशन सिक्योरिटी फीस 200 रुपये असेल. सध्या ही फी 160 रुपये आहे.
टीव्ही महागणार -
1 एप्रिलपासून टेलिव्हिजनच्या किंमतीत 2000 ते 3000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. यापूर्वीही मागील 8 महिन्यातच किंमती 3 ते 4 हजारांनी वाढल्या आहेत. त्यामुळे टीव्ही मॅन्युफॅक्चर्सने टीव्ही पीएलआय स्किम्समध्ये आणण्याची मागणी केली आहे.
AC, फ्रिज, कुलर महागणार -
या उन्हाळ्यात नवा एसी किंवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मोठा झटका बसू शकतो. एप्रिलपासून AC कंपन्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. कंपन्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे एसीच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. AC कंपन्या किंमतीत 4 ते 6 टक्के वाढ करण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच एसीच्या एका यूनिटच्या किंमतीत 1500 ते 2000 रुपयांची वाढ होऊ शकते.
कार -
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च महिन्यातच खरेदी करा. कारण एप्रिलपासून कार खरेदी करणं महागणार आहे. जापानी कंपनी Nissan ने आपल्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. तसंच Datsun कारच्या किंमतीही वाढणार आहेत. Renault Kiger देशातील सर्वात स्वस्त कॉप्मॅक्ट एसयूव्ही देखील महागणार आहे. कृषी उपकरणं तयारी करणाऱ्या एस्कॉर्ट्स लिमिटेडनेही (Escorts Limited) Escorts Agri Machinery एप्रिलपासून ट्रॅक्टरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money