भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या बदलाचे संकेत, परदेशी गुंतवणुकदारांनी उचललेलं पाऊल आशादायी

भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या बदलाचे संकेत, परदेशी गुंतवणुकदारांनी उचललेलं पाऊल आशादायी

भारतीय अर्थव्यवस्था सध्या संकटात अडकली असून तिला गती मिळण्याची वाट सगळेच पाहत आहेत. अशावेळी एक खुशखबर मिळते आहे.

  • Share this:

20 डिसेंबर, नवी दिल्ली : कोरोना (corona) आणि परिणामी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं (economy0) अगदीच कंबरडं मोडलं होतं. मात्र आता काही आशादायी चिन्हं दिसू लागली आहेत.

विदेशातील गुंतवणुकदार एखाद्या बाजारात पैसा लावतात अथवा नाही, तो किती लावतात ही बाब अर्थव्यवस्ठेबाबत अतिशय सूचक मानली जाते. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. एफपीआय अर्थात फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्सनी बाजारात 54, 980 कोटी रुपये गुंतवले आहेत.

जागतिक बाजारातील अतिरिक्त रक्कम आणि विविध केंद्रीय बॅंका एकीकडे प्रोत्साहन पॅकेजच्या आशेवर असताना एफपीआय  गुंतवणूक मात्र कायम आहे. डिपॉजिटरी आकड्यांनुसार एफपीआयनं 18 डिसेंबरदरम्यान शेअर बाजारात पैशाच्या रुपात 48,858 रुपये लावले आणि बॉन्ड्सच्या रुपात 6,112 रुपये लावले. या काळात एकुण गुंतवणूक 54,980 कोटी रुपये इतकी झाली.

हे ही वाचा-PPF मध्ये गुंतवणूक केल्यास कसा होईल नफा? जाणून घ्या 4 महत्त्वाचे फायदे

गेल्या महिन्यात देशात झाली होती 62,951 रुपयांची गुंतवणूक

एफपीआय गुंतवणूक - नोव्हेंबर महिन्यात शुद्ध एफपीआय गुंतवणूक 62,951 इतका होता. याबाबत मॉर्निंग स्टारचे असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, जागतिक बाजारात अतिरिक्त रोकड आणि कमी व्याजदर असल्याने भारतासारखे नव्या दमाचे बाजार विदेशी गंगाजळीनं वाहत आहेत.

त्यांनी म्हटलं, की याच्याशिवाय विविध देशांच्या केंद्रीय बॅंकाद्वारे आर्थिक वाढीला गती देण्यासाठी अजून एका प्रोत्साहन पॅकेजच्या आशेवरही विदेशी गुंतवणुकदार धोका पत्करत आहेत. याशिवाय हीसुद्धा आशा आहेच, की कोविड 19 ची लस आल्यानंतर उदयोन्मुख बाजारांच्या वाढीला गती मिळेल.

एफपीआय गुंतवणूक म्हणजे काय

फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टमेंट कुठल्याही परकीय देशात स्टॉक आणि बॉन्डच्या रुपात केला जातो. या गुंतवणुकीत एखाद्या देशाचे रहिवासी नसलेल्या लोकांद्वारे शेअर, सरकारी बॉन्ड इत्यादीच्या रुपात गुंतवणूक केली जाते. अल्पकालीन वित्तीय लाभ मिळवण्यासाठी अशी गुंतवणूक केली जाते. एफपीआय थेट गुंतवणुकदाराकडून आयोजित केलं जातं.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 9:42 PM IST

ताज्या बातम्या