मुंबई : रतन टाटा एक असं नाव आहे ज्यांचा अभिमान संपूर्ण देशाला आहे. रतन टाटा यांनी स्टील इंडस्ट्री आणि त्यासोबत उद्योग व्यवसायत एक नवीन क्रांती घडवून आणली. टाटा तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी उत्तम दर्जाच्या आणि ग्राहकांच्या बजेटचा विचार करून चांगल्या दर्जाच्या वेगवेगळ्या क्लाससाठी गाड्याही आणल्या आहेत.
एक काळ असा होता की रतन टाटांना एक नामवंत कंपनीच्या मालकाने कार तयार करण्यावरुन हिणवलं होतं. त्याचा संदर्भ इथे देण्याचं कारण हेच की वेळ सगळ्यावर उत्तर असतं. आज त्याच कंपनीसोबत रतन टाटा यांनी डिल पक्क केलं आणि ती कंपनी विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे.
टाटा मोटर्सने फोर्ड मोटर्सचा व्यवसाय टेकओव्हर केला. अमेरिकेतील वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोर्ड मोटर्सने भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे. कंपनीने भारतातील आपला प्लांट टाटा मोटर्सला विकला.
Ratan Tata : कोणत्याही उद्योजकानं रतन टाटांकडून शिकाव्या अशा 4 गोष्टी
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (यूटीएवायएल) च्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील साणंद येथे असलेल्या फोर्ड मोटर्स प्लांटचे हस्तांतरण पूर्ण झालं. हा प्लांट 725.7 कोटी रुपयांना विकला आहे. याबाबतच्या कराराची प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टपासून सुरू झाली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.
नेमका काय होता तो किस्सा?
90 च्या दशकातमध्ये जेव्हा टाटा मोटर्सकडून फोर्ड कंपनीशी चर्चा करण्यात आली त्यावेळी रतन टाटा यांचा अपमान करण्यात आला होता. टाटा मोटर्स आपलं डिव्हिजन त्यावेळी विकण्यासाठी फोर्ड कंपनीसोबत चर्चा करण्याच्या तयारीत होते. रतन टाटा यांचा अपमान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय मागे घेतला आणि फोर्ड कंपनीला असा धडा शिकवला ज्याचा विचारही केला नसेल.
Ratan Tata unknown Facts : आई-वडील नाही तर 'या' खास व्यक्तीनंं सांभळलं रतन टाटांना
रतन टाटा यांनी आपल्या अपमानावर त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते शांत राहिले आणि त्यांनी आपल्या कामातून फोर्ड कंपनीला उत्तर दिलं. 9 वर्षांनंतर 2008 मध्ये टाटा मोटर्स हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. यासोबत बेस्ट सेलिंगमध्ये टाटा मोटर्सची कार होती.
या सगळ्या गोष्टी होत असताना भारतात मात्र फोर्ड कंपनीची अवस्था अत्यंत वाईट होत चालली होती. डुबणाऱ्या या कंपनीला रतन टाटा यांनी अखेर आधार दिला. मात्र ही मदत नव्हती तर आपल्या कामातून त्यांनी आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला होता. आज याच कंपनीचा भारतातील प्लांट टाटा मोटर्सने खरेदी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Ratan tata