Home /News /money /

सलग 3 वर्ष डिसेंबर महिन्यात या 8 शेअर्समध्ये येते 10% पेक्षा जास्त तेजी, तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

सलग 3 वर्ष डिसेंबर महिन्यात या 8 शेअर्समध्ये येते 10% पेक्षा जास्त तेजी, तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Share Market Investment: मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर असे 8 शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षांत प्रत्येक डिसेंबर महिन्यात किमान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: दिवाळी आणि त्यानंतरच्या काही दिवसांत ऐतिहासिक उच्चांक स्थापन करणाऱ्या शेअर बाजारात गेल्या महिन्याभराच्या काळात मोठे चढ-उतार होत आहेत. बाजारात घसरणीचा कल वाढता असून, काल शुक्रवार (26 नोव्हेंबर) चा दिवस तर गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक फ्रायडे (Black Friday for share Market) ठरला. शुक्रवारी एका दिवसात सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला तर निफ्टी 500 अंकांनी गडगडला. साधारण महिन्याभराच्या कालावधीत सेन्सेक्स 61,765 च्या उच्चांकावरून जवळपास 3,000 अंकांनी किंवा 5 टक्क्यांनी घसरला आहे. याचा फटका मुंबई शेअर बाजारातल्या अनेक शेअर्सना बसला आहे. अनेक शेअर्स उच्चांकावरून मोठी घसरण नोंदवून खालच्या स्तरावर आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. यात काही शेअर्स असे आहेत, ज्यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. मनीकंट्रोल एसडब्ल्यूओटी विश्लेषणानुसार, मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर असे 8 शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षांत प्रत्येक डिसेंबर महिन्यात किमान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. या कंपन्यांची मार्केट कॅप 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मनीकंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या या आठ शेअर्सपैकी चार शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. हे वाचा-31 मार्चपर्यंत मिळेल मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ, वाचा काय आहे प्रक्रिया ब्लॅक बॉक्स लि. (पूर्वी AGC नेटवर्क) Black Box Ltd. (formerly AGC Networks): डिसेंबर 2018 मध्ये हा शेअर 11 टक्क्यांनी वाढला होता. डिसेंबर 2019 मध्ये 19 टक्के, तर डिसेंबर 2020मध्ये त्यात 24 टक्क्यांनी वाढ झाली. आता मात्र यात घसरण झाली आहे. डिसेंबर महिन्यात या शेअरमध्ये काय बदल होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल हिंदुस्थान फूड्स लि.,(Hindustan Foods Ltd.) : डिसेंबर 2018 मध्ये या शेअरच्या किमतीत 16 टक्क्यांनी वाढ झाली होती. डिसेंबर 2019 मध्ये 14 टक्के, तर डिसेंबर 2020 मध्ये त्यात तब्बल 75 टक्के वाढ झाली होती. सध्याही या शेअरच्या किमतीत तेजी दिसत आहे. जेएसडब्ल्यू इस्पात स्पेशल प्रॉडक्ट्स लि. (JSW Ispat Special Products Ltd) : डिसेंबर 2018 मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली होती. डिसेंबर 2019 मध्ये 45 टक्के, तर डिसेंबर 2020 मध्ये त्यात 61 टक्के वाढ झाली. सध्या मात्र या शेअरमध्ये घसरणीचा कल दिसून येत आहे. जेटीएल इन्फ्रा लि. (JTL Infra Ltd.) : या शेअरच्या किमतीत डिसेंबर 2018 मध्ये 15 टक्के, डिसेंबर 2019मध्ये 14 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या यात तेजीचा कल आहे. हे वाचा-Gold investment: सोन्यात करायची आहे गुंतवणूक तर सोमवारपासून मिळेल संधी केल्टन टेक सोल्युशन्स लि. (Kellton Tech Solutions Ltd.) : डिसेंबर 2018 मध्ये 32 टक्के, डिसेंबर 2019मध्ये 19 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 39 टक्के वाढ नोंदवणाऱ्या या शेअरमध्ये सध्या तेजीचा कल दिसून येत आहे. राणे (मद्रास) लि. Rane (Madras) Ltd.: या कंपनीच्या शेअरमध्ये डिसेंबर 2018 मध्ये11 टक्के वाढ झाली होती. डिसेंबर 2019 मध्ये तो तब्बल 34 टक्के वधारला, तर डिसेंबर 2020 मध्ये त्यात 15 टक्के वाढ झाली. सध्या मात्र हा शेअर कमकुवत दिसत आहे. टाटा स्टील बीएसएल लि. (Tata Steel BSL Ltd.):  डिसेंबर 2018 मध्ये 46 टक्क्यांनी वाढलेला हा शेअर डिसेंबर 2019मध्ये 11 टक्के, तर डिसेंबर 2020 मध्ये 13 टक्के वधारला होता. आता सध्याही या शेअरच्या किमतीत चांगली वाढ दिसून येत आहे. यारी डिजिटल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लि. (Yaarii Digital Integrated Services Ltd.) : डिसेंबर 2018 मध्ये यात 21 टक्क्यांनी वाढ झाली होती. डिसेंबर 2019मध्ये 20 टक्के, तर डिसेंबर 2020 मध्ये त्यात तब्बल 70 टक्के वाढ झाली होती. सध्या यात घसरणीचा कल दिसून येत आहे.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या