मराठी बातम्या /बातम्या /मनी /

करदात्यांनो, सावधान! अटल पेन्शन योजनचा लाभ घ्यायचा असेल तर 'या' तारखेआधी व्हा सदस्य

करदात्यांनो, सावधान! अटल पेन्शन योजनचा लाभ घ्यायचा असेल तर 'या' तारखेआधी व्हा सदस्य

अटल पेन्शन योजनेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी 30 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख असणार आहे. या योजनेचं सदस्य होण्यासाठी एक खिडकी 50 दिवस सुरु असणार आहे.

अटल पेन्शन योजनेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी 30 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख असणार आहे. या योजनेचं सदस्य होण्यासाठी एक खिडकी 50 दिवस सुरु असणार आहे.

अटल पेन्शन योजनेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी 30 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख असणार आहे. या योजनेचं सदस्य होण्यासाठी एक खिडकी 50 दिवस सुरु असणार आहे.

मुंबई, 12 ऑगस्ट: अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इन्कमटॅक्स (Income Tax) भरणाऱ्यांना ऑक्टोबर 2022 नंतर अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही अशी महत्त्वाची घोषणा अर्थ मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जर एखाद्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला अटल पेन्शन योजनेचं सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी 30 सप्टेंबर 2022 ही अंतिम तारीख असणार आहे. या योजनेचं सदस्य होण्यासाठी एक खिडकी 50 दिवस सुरु असणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी नवीन निवेदन लागू होणार नाही. बँकेत FD करण्याआधी RBIने बदललेले नियम जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी अटल पेन्शन योजना सुरु करण्यासाठी हे 10 मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. >> अर्थ मंत्रालयाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या गॅझेट नोटिफिकेशननुसार, जी व्यक्ती इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे इन्कम टॅक्स भरण्यास पात्र आहे, ती व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 पासून अटल पेन्शन योजनेत (APY) सहभागी होऊ शकणार नाही. >> 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर अटल पेन्शन योजनेत (APY) सहभागी झालेल्या व्यक्ती जर नवीन नियम अस्तित्वात येण्याआधीपासून इन्कमटॅक्सचा करदाता (Income Tax Payers) असेल असं लक्षात आलं तर त्या क्षणी त्याचं/तिचं अकाउंट रद्द केलं जाईल. >>  मात्र, पेन्शनची रक्कम किंवा जमा झालेली पेन्शनची रक्कम ही एकाच वेळेस परत दिली जाईल. >> 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल पेन्शन योजनेची सुरुवात झाली. असंघटित क्षेत्रांतील लोकांना म्हातारपणी आर्थिक सुरक्षितता मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. >> 18-40 वर्ष वयोगटांतील कोणत्याही भारतीय नागरिकाला APY मध्ये सहभागी होता येते. यासाठी त्या व्यक्तीचं बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे. APY ही सरकारी योजना PFRDFAच्या वतीने NPS आर्किटेक्चरद्वारे चालवण्यात येते. >> APY मध्ये सहभागी होण्यासाठी कमीतकमी वयोमर्यादा 18 वर्षे तर जास्तीतजास्त वयोमर्यादा 40 वर्षे आहे. त्यामुळे अटल पेन्शन योजनेत सहभागी झालेल्या व्यक्तीसाठी या योजनेत योगदान देण्याचा कालावधी 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असतो. भाड्याच्या घरावरही GST? नवीन नियमानुसार 'या' भाडेकरुंना भरावा लागणार 18 टक्के टॅक्स >> महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षानंतर या योजनेतून कमीतकमी 1000 ते 5000 रुपयांपर्यंतचं हमखास पेन्शन दिलं जातं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा सदस्य असलेल्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला आयुष्यभरासाठी पेन्शनची हमी आहे. तिसरं म्हणजे जर सदस्य असलेली व्यक्ती आणि त्याचा जोडीदार दोघांचाही मृत्यू झाला तर संपूर्ण पेन्शनची रक्कम नॉमिनीला दिली जाते. >> अटल पेन्शन योजनेसाठी दर महिन्यात काही ठराविक रक्कम दिली जाते. APY च्या सदस्यांना 60 वर्षांचे झाल्यावर दरमहा 1,000 रु., दरमहा 2000रु., दरमहा 3,000रु., दरमहा 4,000रु., दरमहा 5,000 रु. अशी पेन्शनची ठराविक रक्कम दिली जाते. सदस्यांचं योगदान म्हणजे ते किती पैसे भरत आहेत आणि त्यांचं वय यावर ही रक्कम अवलंबून असते. >> अटल पेन्शन योजनेच्या सदस्यांना करमाफीचे फायदे मिळतात. त्यांच्या आणि त्यांच्या कंपनी/मालकांच्या योगदानानुसार कलम 80 CCD आणि 80 CCE या अंतर्गत हे फायदे मिळतात.
First published:

Tags: Central government, Investment, Money, Pension scheme

पुढील बातम्या