• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • नव्या Income Tax e-filing portal साठी केंद्राने इन्फोसिसला दिले 164.5 कोटी

नव्या Income Tax e-filing portal साठी केंद्राने इन्फोसिसला दिले 164.5 कोटी

केंद्र सरकारने संसदेत याबाबत माहिती दिली.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 जुलै : केंद्र सरकारने नव्या इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलसाठी (Income Tax e-filing portal) इन्फोसिस (Infosys) या सर्वांत मोठ्या आयटी कंपनीला 164.5 कोटी रुपये वितरित केले आहेत. या रकमेचं वितरण जानेवारी 2019 ते जून 2021 दरम्यान करण्यात आलं आहे. सरकारने सोमवारी (26 जुलै) संसदेत याबाबत माहिती दिली. इन्फोसिसला ही निविदा Integrated e-filing & Centralized Process center (CPC 2.0) Project च्या माध्यमातून खुल्या निविदेअंतर्गत प्राप्त झाली होती. सर्वांत कमी निविदा दराच्या आधारे ही निविदा इन्फोसिसला देण्यात आली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Of State For Finance Pankaj Choudhari) यांनी एका लेखी प्रश्नाला लोकसभेत उत्तर देताना सांगितलं, की या प्रकल्पांतर्गत इन्फोसिसला 164.5 कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Cabinet) 16 जानेवारी 2019 रोजी 4,241.97 कोटी रुपयांच्या या सीपीसी प्रकल्पाला (CPC Project) मंजुरी दिली होती. हा प्रकल्प 8.5 वर्षांसाठी होता. यात जीएसटी, रेंट, पोस्टेज आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॉस्ट यांचा समावेश होता. हे वाचा - ATM मधून पैसे काढणं महागणार, डेबिट-क्रेडिट कार्डसाठीही मोजावे लागणार जास्त पैसे या सीपीसी 2.0 अंतर्गत यंदा 7 जून रोजी सरकारनं नवं Income Tax e-filing portal सादर केलं. मात्र करदाते, कर व्यावसायिक आणि इतर भागधारकांनी या नव्या पोर्टलमधील अनेक समस्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. या पोर्टलची निर्मिती करणाऱ्या इन्फोसिसला सर्व समस्यांबाबतची माहिती दिली गेली आहे. आयकर विभाग आणि कंपनी यांच्या समन्वयातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. आयकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलसंदर्भात आतापर्यंत 700 हून अधिक ई-मेल्समिळाले असून, त्यात 2000 हून तक्रारी असल्याचं सरकारनं कबूल केलं आहे. आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाइटमध्ये विविध प्रकारच्या 90हून अधिक समस्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारला तक्रारी पाठवणाऱ्यांमध्ये कर व्यावसायिक, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आणि करदात्यांचा समावेश आहे. हे वाचा - आजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (Income Tax Return File) करण्यासाठी नवी वेबसाइट जूनमध्ये सादर केली. आयकर विभागाचं हे नवं ई-फायलिंग पोर्टल सादर झाल्यानंतर या पोर्टलमुळे करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ई-फायलिंग पोर्टलच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते.
First published: