मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँक FD पेक्षा जास्त व्याज हवंय, Post Office चांगला पर्याय ठरु शकतो, चेक करा डिटेल्स

बँक FD पेक्षा जास्त व्याज हवंय, Post Office चांगला पर्याय ठरु शकतो, चेक करा डिटेल्स

कोविड-19 संकटामुळे बँक एफडीचे दर खूपच कमी झाले आहेत आणि अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

कोविड-19 संकटामुळे बँक एफडीचे दर खूपच कमी झाले आहेत आणि अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

कोविड-19 संकटामुळे बँक एफडीचे दर खूपच कमी झाले आहेत आणि अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 डिसेंबर : बँक एफडी (Fixed Deposit) हा गुंतवणूकदारांमध्ये शॉर्ट टर्मच्या गुंतवणुकीसाठी (Short term investment) सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. यामध्ये धोका खूप कमी आहे. खरंतर निवृत्तीनंतरच्या जोखीममुक्त उत्पन्नासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पारंपरिक गुंतवणूक पर्याय (Investment Options) आहे. मात्र कोविड-19 संकटामुळे बँक एफडीचे दर खूपच कमी झाले आहेत आणि अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफडी गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

बँक एफडीवरील व्याजदर महागाईपेक्षा कमी

लाईव्हमिंटच्या अहवालात, कर आणि गुंतवणूक तज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले की आजकाल बँक एफडीवरील व्याजदर (Bank FD Interest rate) महागाईवर मात करण्यासाठी पुरेसे नाहीत आणि म्हणून एफडी पेक्षा गुंतवणूकदार अधिक व्याजासाठी पोस्ट ऑफिस योजनांचा विचार करू शकतात. कारण पोस्ट ऑफिस एफडी 1 कालावधीसाठी वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांसाठी 5.5 टक्के व्याजदर मिळत आहे जो महागाईच्या सरासरी वार्षिक दराच्या जवळपास आहे.

Investment Tips : म्युच्युअल फंडातून बंपर कमाई करायचीय? 'या' स्ट्रॅटेजीचा वापर करा

बँक एफडी गुंतवणूकदारांची पसंती

एफडी गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसच्या (Post Office Investment) पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला देताना सेबी नोंदणीकृत कर आणि गुंतवणूक तज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणाले, जोखीम घेऊ इच्छित नसलेल्या आणि आर्थिक संकटाचा सामना करू इच्छित नसलेल्या गुंतवणूकदारांसाठी बँक एफडी हा पारंपरिक गुंतवणूक पर्याय आहे. कोविड-19 संकटापूर्वी, बँका त्यांच्या एफडीवर व्याज देत होत्या ज्यामध्ये गुंतवणूकदार वार्षिक महागाईशी जुळवून घेण्यास सक्षम होते. परंतु, आज पोस्ट ऑफिस त्यांच्या एफडीवर 5.5 टक्के ते 6.7 टक्के व्याजदर देत आहे, जे महागाईतील वार्षिक वाढीच्या जवळपास आहे.”

Investment Tips : Fixed Deposit करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या, आर्थिक नुकसान होणार नाही

पोस्ट ऑफिस FD वर व्याजदर

इंडिया पोस्ट वेबसाईटनुसार, 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षांच्या FD वर वार्षिक 5.5 टक्के व्याज मिळते. दुसरीकडे, 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर वार्षिक 6.7 टक्के व्याज मिळते. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की पोस्ट ऑफिस त्यांच्या एफडीवर वार्षिक आधारावर व्याज देते, परंतु त्याची गणना तिमाही आधारावर करते. पोस्ट ऑफिसमध्ये किमान 1000 रुपयांची एफडी केली जाऊ शकते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

आयकर लाभ

पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी केलेल्या एफडी आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत आयकर सवलती मिळवू शकतात.

First published:

Tags: Investment, Money, बँक