Home /News /money /

कोरोनाबाधितांना मोदी सरकारचा मोठा दिलासा! उपचारासाठीचा इतका खर्च TAX FREE

कोरोनाबाधितांना मोदी सरकारचा मोठा दिलासा! उपचारासाठीचा इतका खर्च TAX FREE

कोरोना उपचारासाठी (Coronavirus Treatment) कंपनी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून घेण्यात आलेली 10 लाखाची रक्कम करमुक्त असणार आहे.

    नवी दिल्ली, 26 जून: कोरोना काळात (Coronavirus in India) मोदी सरकारने (Modi Government) शुक्रवारी करदात्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत माहिती देताना असं म्हटलं आहे की, कोरोना उपचारासाठी (Coronavirus Treatment) होणाऱ्या खर्चावर करामध्ये सवलत देण्यात येईल. ठाकुर यांनी अशी माहिती दिली आहे की, त्या लोकांना करामध्ये सूट मिळेल ज्यांनी कोरोना उपचारासाठी 10 लाखापर्यंत रक्कम खर्च केली आहे. अनुराग ठाकुर यांनी असं म्हटलं आहे की, 'जर एखाद्या नियुक्तीकर्त्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोव्हिड उपचारासाछी खर्च केला, तर त्या कर्मचाराला त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. जर एखाद्याच्या मृत्यूनंतर नियुक्तीकर्ताने त्याच्या कर्मचाऱ्याला एक्सग्रेशिया रक्कम दिली तर त्या व्यक्तीला करामध्ये सूट मिळेल.' हे वाचा-ऑनलाइन FD करताना सावधान! रिकामं होईल तुमचं खात, SBI ने दिला महत्त्वाचा इशारा ठाकुर यांनी पुढे असं म्हटलं आहे की, 'जर एखादी इतर व्यक्ती संबंधित व्यक्तीला मदत करते आणि मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मदत करते, तर त्या कुटुंबाला त्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही, पण याकरता 10 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.' केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करून असं म्हटलं आहे की, 'सरकारेन कोव्हिडबाधितांच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण काळजी घेतली आहे. उपचारासाठी खर्च रकमेमध्ये नियोक्ता आणि पीडित दोघांना इन्कम टॅक्स सूट दिल्याने त्यांना नक्कीच दिलासा मिळेल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणकारी निती स्पष्ट होत आहे.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Modi government

    पुढील बातम्या