Home /News /money /

Campus Activewear : कॅम्पस शूज कंपनी आणणार IPO; SEBI कडे ड्राफ्ट पेपर जमा

Campus Activewear : कॅम्पस शूज कंपनी आणणार IPO; SEBI कडे ड्राफ्ट पेपर जमा

कॅम्पस ऍक्टिव्हवेअरने (Campus Activewear) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक म्हणजेच SEBI कडे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर केला आहे. 5.1 कोटी इक्विटी शेअर्सचा हा IPO पूर्णपणे प्रमोटर आणि गुंतवणूकदारांच्या ऑफर फॉर सेल आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 डिसेंबर : खाजगी इक्विटी फर्म TPG द्वारे गुंतवलेल्या स्पोर्ट्स फुटवेअर ब्रँड कॅम्पस ऍक्टिव्हवेअरने (Campus Activewear) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक म्हणजेच SEBI कडे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर केला आहे. 5.1 कोटी इक्विटी शेअर्सचा हा IPO पूर्णपणे प्रमोटर आणि गुंतवणूकदारांच्या ऑफर फॉर सेल आहे. प्रमोटर्स त्यांचे शेअर्स विकतील प्रमोटर हरी कृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल ऑफर फॉर सेलद्वारे (Offer for Sale) 1.4 कोटी शेअर्स विकतील. गुंतवणूकदार TPG Growth 3SF प्रा. लि. 3 कोटी इक्विटी शेअर्स आणि क्यूआरजी एंटरप्रायझेस 67 लाख शेअर्स विकणार आहेत. याशिवाय राजीव गोयल आणि राजेश कुमार गुप्ता OFS च्या माध्यमातून 3 लाख शेअर्स विकणार आहेत. अशा प्रकारे, IPO मधून उभारलेले भांडवल भागधारकांकडे जाईल आणि कंपनीला त्यातून कोणताही निधी मिळणार नाही. WhatsApp देणार नजीकच्या स्टोअर्स, रेस्टॉरंट्सची माहिती; कसं आहे नवीन फीचर? कॅम्पस भारतातील सर्वात मोठा क्रीडा-खेळाडू फुटवेअर ब्रँड कंपनीचे 78.21 टक्के शेअरहोल्डिंग प्रमोटर्सकडे आहे आणि उर्वरित 21.79 टक्के भागभांडवल TPG Growth 3SF Pvt ltd कडे (17.19 टक्के) आणि क्यूआरजी एंटरप्रायझेस (3.86 टक्के) आहे. कॅम्पस ऍक्टिव्हवेअरने FY21 मध्ये मूल्य आणि व्हॉल्यूमच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा स्पोर्ट्स आणि ऍथलीझर फुटवेअर ब्रँड असल्याचा दावा केला आहे. 'कॅम्पस' हा ब्रँड 2005 मध्ये लाँच झाला. एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत ब्रँडेड स्पोर्ट्स मार्केटमध्ये कंपनीचा 15 टक्के हिस्सा DRHP फाइलिंगनुसार, कंपनीचा FY20 मध्ये मूल्यानुसार भारतातील ब्रँडेड स्पोर्ट्स आणि ऍथलीझर फूटवेअर उद्योगात 15 टक्के बाजार हिस्सा आहे, जो FY21 मध्ये 17 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 21-25 मध्ये भारतातील फुटवेअर रिटेल मार्केट 21.6 टक्के CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. इश्यूसाठी, जेएम फायनान्शिअल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, सीएलएसए इंडिया आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी हे प्रमुख व्यवस्थापक आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या