• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ऑक्टोबरआधी Flipkart देणार 70000 लोकांना नोकरी, कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही

ऑक्टोबरआधी Flipkart देणार 70000 लोकांना नोकरी, कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही

फ्लिपकार्ट (Flipkart) फेस्टीव्ह सीझनमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale)आधी जवळपास 70 हजार जणांना नोकरी देणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट (Flipkart)फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale)आधी जवळपास 70 हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या (Indirect Jobs) देखील फ्लिपकार्ट उपलब्ध करणार आहे. फ्लिपकार्ट नोकरी दिल्यानंतर लोकांना प्रशिक्षण देखील देणार आहे. यासाठी क्लासरूम आणि डिजिटल पद्धतीने कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय Supply Chain Management बाबत अत्यावश्यक माहिती देखील देण्यात येत ​​आहे. याशिवाय फ्लिपकार्ट ग्राहक सेवा, वितरण, इन्स्टॉलेशन तसंच सुरक्षा आणि स्वच्छताविषयक उपाय याबाबतचे ट्रेनिंग देत आहे. त्याचप्रमाणे पीओएस मशीन, स्कॅनर, विविध मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स आणि ईआरपी यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. (हे वाचा-सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे ग्राहकांसाठी खास गिफ्ट, कर्जावरील EMI झाला कमी) याचा फायदा असा की प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य सुधारेल. Amazon देखील देत आहे नोकरीची संधी अ‍ॅमेझॉनकडून सोमवारी अशी माहिती देण्यात आली आहे की, ऑनलाइन ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळे आणखी 100,000 लोकांना नोकरी दिली जाणार आहे. अ‍ॅमेझॉनने सांगितले की नवीन हायरिंग पार्ट टाइम किंवा फुल टाइम असेल. यामध्ये ऑर्डरची पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्ट करण्यात मदत करावी लागेल. अ‍ॅमेझॉनने सांगितले की या नोकर्‍या हॉलीडे हायरिंगशी संबंधित नाहीत. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीस 175,000 लोकांना काम दिले होते. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळातही 1 ऑक्टोबरपासून देशभरात उघडणार सिनेमागृहं?) 100 नवीन वेअरहाऊसमध्ये पॅकेज सॉर्टींग सेंटर आणि इतर सुविधांसाठी लोकांची गरज असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊसवर देखरेख ठेवणाऱ्या एलिसिया बोलर डेविसचे असे म्हणणे आहे की,  डेट्रॉईट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया केंटकी आणि लुईसविले याठिकाणी कामगार शोधण्यास कठीण असणाऱ्या शहरात कंपनी 1000 डॉलरचे साइन ऑन बोनस देणार आहे. Amazonमधील या नोकरीसाठी सुरुवातीचा पगार ताशी 15 डॉलर (1100 रुपयांपेक्षा जास्त) आहे
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: