मराठी बातम्या /बातम्या /मनी /

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; सचिन बन्सल यांनी 'या' शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; सचिन बन्सल यांनी 'या' शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली

सचिन बन्सल यांनी JK Paper मधील आपली हिस्सेदारी जून तिमाहीत 1 टक्क्यांवरून 1.71 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. हा एक Multibagger Stock आहे.

सचिन बन्सल यांनी JK Paper मधील आपली हिस्सेदारी जून तिमाहीत 1 टक्क्यांवरून 1.71 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. हा एक Multibagger Stock आहे.

सचिन बन्सल यांनी JK Paper मधील आपली हिस्सेदारी जून तिमाहीत 1 टक्क्यांवरून 1.71 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. हा एक Multibagger Stock आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 21 ऑक्टोबर : छोट्या आणि नवख्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सोपा मार्ग म्हणजे मोठ्या आणि यशस्वी गुंतवणूकदाराने ज्या शेअरमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) केली त्याला फॉलो करणे. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) मोठ्या आणि यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. आता फ्लिपकार्टचे (Flipkart) माजी सीईओ आणि सह-संस्थापक सचिन बन्सल (Sachin Bansal) यांची गणना आता भारतीय शेअर बाजारातील यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये केली जात आहे. गेल्या काही वर्षांत, त्यांनी गुंतवलेल्या अनेक शेअर्सनी भरघोस रिटर्न दिले आहेत. बरेच स्टॉक तर मल्टीबॅगरही बनले आहेत. यामुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदार त्यांना फॉलो करत आहेत. सचिन बन्सल यांना फॉलो करणाऱ्या या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की बन्सल यांनी जेके पेपरमधील आपला हिस्सा वाढवला आहे. सप्टेंबर तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सचिन बन्सल यांनी जेके पेपरमधील आपली हिस्सेदारी मागील तिमाहीत म्हणजेच जून तिमाहीत 1 टक्क्यांवरून 1.71 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. या स्टॉकने देखील आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षी मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Stock ) दिला आहे. सरकारकडून करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये रिफंड, तुमचं रिफंड स्टेटस कसं चेक कराल? JK Paper ची शेअरहोल्डिंग चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस जाहीर केलेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सचिन बन्सल यांच्याकडे या पेपर कंपनीमध्ये 29 लाख शेअर्स आहेत. बन्सल यांच्याकडे एप्रिल-जून तिमाहीत 17 लाख शेअर्स किंवा 1 टक्के हिस्सा होता. अशाप्रकारे बन्सल यांनी सप्टेंबर तिमाहीत जेके पेपरचे 11 लाख अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. New IPO : ऑनलाईन फर्निचर कपंनी Pepperfry पुढील वर्षी IPO आणण्याच्या तयारीत JK Paper शेअरवर तज्ज्ञांचे मत शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, जेके पेपरचे शेअर्स सध्या 230 रुपयांच्या मजबूत सपोर्टसह व्यापार करत आहेत आणि शॉर्ट ते मीडियम टर्ममध्ये हा शेअर 275 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एका ब्रोकरेज फर्मचे अॅनालिस्टने म्हटले की, स्टॉक चार्टवर खूप मजबूत दिसत आहे. सध्याच्या किंमतींवर खरेदी करणे चांगली खरेदी असू शकते. स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये 255 रुपये आणि मिड टर्ममध्ये 275 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यासाठी गुंतवणूकदार 215 रुपयांचा स्टॉप लॉसवर हा शेअर खरेदी करु शकता.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या