• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरुवात! या प्रोडक्ट्सवर मिळेल 75-80% Discount

Flipkart Big Diwali Sale ला आजपासून सुरुवात! या प्रोडक्ट्सवर मिळेल 75-80% Discount

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) संपल्यानंतर आता कंपनीने 17 ऑक्टोबरपासून बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale 2021) सुरू केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर: जर तुम्ही सणासुदीच्या काळात खरेदी करू इच्छित (Festive Season Shopping) असाल तर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) संपल्यानंतर आता कंपनीने 17 ऑक्टोबरपासून बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale 2021) सुरू केला आहे. ही विक्री फ्लिपकार्ट सदस्यांसाठी खास असेल. 'बिग दिवाळी सेल' मध्ये मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या इतर लाखो उत्पादनांवर मोठी सूट देण्याचा दावा कंपनीकडून करण्यात केला आहे. मिळेल 70-80% डिस्काउंट फ्लिपकार्ट 'बिग दिवाळी सेल 2021' 17 ऑक्टोबरपासून अर्थात आजपासून सुरू झाला आहे आणि 23 ऑक्टोबर 2021 रोजी SBI कार्ड ऑफरसह संपेल. तसेच फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल दरम्यान HDFC/Axis/ICICI कडून नो कॉस्ट EMI पर्याय देखील देण्यात येत आहेत. 7 दिवस असणाऱ्या या सेलमध्ये फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्डच्या वापरावर 10 टक्के सूट देत आहे. याशिवाय टीव्ही खरेदी करणाऱ्यांना 75 टक्केपर्यंच आणि लॅपटॉप, मोबाईल आणि टॅब्लेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 80 टक्के पर्यंत सूट दिली जाईल. वाचा-Hero मध्ये सुरू आहे फेस्टिव धमाका! केवळ 6,999 रुपये देऊन घरी आणा बाईक्स याशिवाय, पेटीएम युजर्सना फायनल पेमेंट पेजवर अतिरिक्त सवलत आणि कॅशबॅक ऑफर देखील मिळतील. फ्लिपकार्टने असेही जाहीर केले आहे की फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना बिग दिवाळी 2021 सेलमध्ये प्रथम प्रवेश मिळेल, म्हणजेच या ग्राहकांसाठी प्रथम विक्री सुरू होईल. टीव्हीवर डिस्काउंट ऑफर सॅमसंगच्या 50-इंच निओ QLED स्मार्ट टीव्हीची किंमत 30,999 रुपये, शाओमीच्या 43-इंच Mi 4X अल्ट्रा एचडी (4K) स्मार्ट एलईडी अँड्रॉइड टीव्हीची किंमत 23,999 रुपये आहे. कंपनीच्या साइटनुसार तुम्ही Realme चे 43-इंच 4K LED स्मार्ट टीव्ही 7,499 रुपयांना खरेदी करू शकता. स्मार्टफोनवर सूट दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्ट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्सही देत ​​आहे. या सेलमध्ये ग्राहक Poco F3 GT 5G हा फोन 25,999 रुपयांना आणि Realme GT Master Edition 21,999 रुपयांना खरेदी करू शकतात. ही ऑफर केवळ प्रीपेड व्यवहारांवर उपलब्ध असेल. Realme चा फोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. वाचा-Aadhaar Card असेल तर काही Clicks वर मिळेल कर्ज, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय? सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांना  खरेदी करता येईल. याशिवाय iPhone 12, iPhone 12 Mini आणि iPhone SE सारख्या लोकप्रिय Apple डिव्हाइसेसवर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये सूट मिळणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: