Home /News /money /

Fixed Deposite का आहे सुरक्षित गुंतवणूक, आणखीही काय फायदे मिळतात? चेक करा डिटेल्स

Fixed Deposite का आहे सुरक्षित गुंतवणूक, आणखीही काय फायदे मिळतात? चेक करा डिटेल्स

मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढण्याची संधी आहे. मात्र जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. एफडीच्या या वैशिष्ट्यामुळे याला लिक्विड इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जानेवारी : मुदत ठेव किंवा फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) खाते ही सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीसाठी लोकप्रिय योजना आहे. FD मध्ये एखाद्याला ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. फिक्स्ड डिपॉझिट खात्यात जमा केलेल्या रकमेवर फिक्स्ड इंटरेस्ट तर मिळतोच पण सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात पैसे सुरक्षित राहतात. बाजारातील सर्व चढउतारांचा एफडीवर कोणताही परिणाम होत नाही. मुदत ठेवींवर पूर्व-निर्धारित दराने व्याज मिळते. जेव्हा FD मॅच्युअर होते, तेव्हा मूळ रकमेसह व्याज दिले जाते. येथे गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदर आणि भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. म्हणून, जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा पहिला पर्याय फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD असा दिसतो. वेगवेगळ्या बँकांना एफडीवर वेगवेगळे व्याजदर मिळतात. FD चे प्रकार तुम्ही FD मध्ये वेगवेगळ्या प्रकारे देखील गुंतवणूक करू शकता. तुमच्याकडे क्युमलेटिव्ह किंवा नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. क्युमलेटिव्ह एफडीवरील व्याज ठेवीच्या कालावधी दरम्यान जमा केले जाते आणि नंतर पूर्ण परतावा मुदतपूर्तीवर दिला जातो. तर नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर तुम्हाला मासिक, सहामाही किंवा वार्षिक व्याज मिळते. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर सरकारी बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुदत ठेवी ठेवता येतात. तुम्ही तुमच्या पैशाची FD 7 दिवसांसाठी देखील बँकेत करु शकता आणि 10 वर्षांसाठीही पैसे गुंतवू शकता. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवाल तितके जास्त व्याज मिळेल. एफडीचे फायदे मुदत ठेवीमध्ये, तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढण्याची संधी आहे. मात्र जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. एफडीच्या या वैशिष्ट्यामुळे याला लिक्विड इन्व्हेस्टमेंट असेही म्हणतात. अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, तुम्ही ताबडतोब पैसे काढू शकता. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी FD वर कर्ज तुम्ही केलेल्या एफडीवर बँकेकडून कर्जही सहज उपलब्ध होते. काही बँका त्याच्या आधारे ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील देतात. तुमची FD बँकांसाठी हमी म्हणून काम करते, जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर कर्जाचे पैसे तुमच्या FD द्वारे कव्हर केले जातील. कर सवलतीचा लाभ तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी FD केल्यास, त्यावर आयकर कलम 80C अंतर्गत कर सूटही मिळते. या अंतर्गत तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची FD केली तर तुम्हाला कर भरावा लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fixed Deposit, Investment, Money

    पुढील बातम्या