Home /News /money /

या बँकेत FD करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता जास्त मिळेल व्याज, तपासा नवे दर

या बँकेत FD करणाऱ्यांसाठी खूशखबर! आता जास्त मिळेल व्याज, तपासा नवे दर

सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या कॅनरा बँकेने (Canara Bank) फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. आधीच्या तुलनेत तुम्हाला अधिक व्याज मिळेल

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: फिक्स्ड डिपॉझिट ही बचत करण्याची एक जुनी आणि विश्वासार्ह पद्धत आहे. आजही सुरक्षित गुंतवणूक म्हणून या पर्यायाला पसंती देतात. तुम्ही देखील FD (Fixed Deposit) काढायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या कॅनरा बँकेने (Canara Bank) फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. आधीच्या तुलनेत तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने आधीच्या व्याजदराच्या तुलनेत 0.2 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीचा फायदा त्या ग्राहकांना होईल ज्यांनी कमीत कमी 2  वर्षाची एफडी काढली आहे. एवढे झाले व्याजदर कॅनरा बँकेच्या मते, या वाढीनंतर किमान 2 वर्षे आणि 3 वर्षांपेक्षा कमी एफडीला आता 5.4 टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा व्याजदर 5.2 टक्के होता. या व्यतिरिक्त 3 ते 10 वर्षाच्या मुदतीच्या एफडीवरील व्याज दर 5.3 वरून 5.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. नवीन दर 27 नोव्हेंबरपासून लागू बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुधारित दरांवर ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का अधिक व्याज दिले जाईल. हे नवीन दर 27 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. व्याज दरात सुधारणा झाल्यानंतर 2 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर कॅनरा बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. एचडीएफसी बँकेने कमी केले व्याज दर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या एफडीवर व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँकेने व्याजदरात 0.20 टक्क्यांनी घट केली आहे. बँकेच्या 1 वर्षाच्या डिपॉझिटवरील व्याज दरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. (हे वाचा-14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल! पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदलाव) त्याच वेळी, 2 वर्षाच्या ठेवींवर बँकेने व्याज दरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दरानुसार एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50% व्याज देत आहे. हा दर 30-90 दिवसात मॅच्यूअर होणाऱ्या डिपॉझिटवर  3% आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या