• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Fixed Deposit पेक्षा जास्त रिटर्न देणारी गुंतवणूक, वाचा सविस्तर

Fixed Deposit पेक्षा जास्त रिटर्न देणारी गुंतवणूक, वाचा सविस्तर

जर तुम्हाला कमी कालावधीत चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला तुमची बचत इतर योजनांमध्ये गुंतवावी लागेल. इथे तुमचा धोका वाढेल असे नाही, FD प्रमाणे या योजनांमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित आहेत.

  • Share this:
    मुंबई, 21 नोव्हेंबर : भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक (Future Investment Planning) महत्वाची आहे. त्यात बँक किंवा सरकारी बाँडमधील गुंतवणुकीवरील व्याज सातत्याने कमी होत आहे. बाजारात सतत अस्थिरता असते, अशा स्थितीत गुंतवणूकदारांसमोर अनेकदा असा प्रश्न येतो की, आपला पैसा कुठे गुंतवावा. जिथे त्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्यांचे पैसेही सुरक्षित असतील. पैसे सुरक्षित असले पाहिजेत यामुळे अनेक लोक त्यांचे पैसे बँकेत एफडी ( Bank Fixed Deposit) करतात. परंतु मुदत ठेवींवरील घटत्या व्याजाने तुमचा उद्देश पूर्ण होत नाही. जर तुम्हाला कमी कालावधीत चांगला परतावा हवा असेल तर तुम्हाला तुमची बचत इतर योजनांमध्ये गुंतवावी लागेल. इथे तुमचा धोका वाढेल असे नाही, FD प्रमाणे या योजनांमध्ये तुमचे पैसेही सुरक्षित आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला एफडीपेक्षा जास्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, 1 ते 3 वर्षे कालावधीच्या गुंतवणुकीवर 5.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचे पैसे 5 वर्षांसाठी गुंतवले तर हे व्याज 6.7 टक्के होईल. Mutual Fund : 15 X 15 X 15 नियमाने बदलून जाईल तुमचं आयुष्य; कमी वेळेत व्हाल कोट्याधीश! कसं? डेट फंड (Debt Fund) जर तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा थोडा जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही डेट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. डेट फंड हे म्युच्युअल फंडांच्या कॅटगरीपैकी एक आहेत. डेट म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बाँड, सरकारी रोखे, ट्रेझरी बिले आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर इत्यादींचा समावेश आहे. Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का? डेट फंड कमी जोखमीसह चांगले परतावा मिळवण्यात मदत करतात. कारण म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर मानली जाते. जर तुम्ही व्याजदराची जोखीम घेऊ शकत नसाल तर तुम्ही लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड, शॉर्ट ड्युरेशन फंड इत्यादीसारख्या शॉर्ट डेट स्कीममध्ये गुंतवणूक करावी. तुम्ही फंड मॅनेजरच्या मदतीने डेट फंडात पैसे गुंतवू शकता. येथे तुम्हाला मुदत ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: